मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (शुक्रवारी, ता26) रात्री मुंबई ते नागपूर असा एकाच विमानाने प्रवास केला. ठाकरे हे त्यांचा पक्ष सोडून गेलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करणार असून त्यासाठी ते इंडिगोच्या विमानाने नागपूरला गेले. आज त्यांचा दौरा सुरू होईल. याच विमानात मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) होते. दोघांमध्ये चर्चा झाली नाही. फक्त एकमेकांचे कुशल दोघांनी विचारले. आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई आदी नेते हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत होते. (Devendra Fadnavis)
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकाच विमानात विमान प्रवासात नेमकं काय झालं?
– देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांचं इंडिगो फ्लाइट मुंबई नागपूर सायंकाळी साडेसहा वाजताच होतं.
– उद्धव ठाकरे आपल्या नियोजित दौऱ्यासाठी नागपूर विमानतळावर उतरून यवतमाळला जाणार होते.
– देवेंद्र फडणवीस पुण्याचा आपला कार्यक्रम आटपून मुंबईतून आले आणि मुंबईतून नागपूरला आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते.
– विमानामध्ये प्रवेश करत असताना देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची एकत्रित भेट झाली.
– “आपण तिघे एकत्रित आलो हीच आजची मोठी बातमी” असं देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समोर बघून म्हणाले
– त्यानंतर सर्व नेते आपापल्या जागेवर विमानात बसले. पूर्ण विमान प्रवासात कुठेही चर्चा झाली नाही विमान नागपूरला पोहोचल्यानंतर एकमेकांशी विचारपूस करत निरोप घेतला.
– देवेंद्र फडणवीस यांचा ताफा नागपूर विमानतळाच्या रनवे वर उभा असल्यामुळे ते आधी निघाले त्यानंतर उद्धव ठाकरे नागपूर विमानतळाच्या बाहेर आले
Uddhav Thackeray & Devendra Fadnavis Travelling in same Flight : आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे
दरम्यान, ‘आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे’ असं देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना म्हणाल्याची माहिती आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केल्याची माहिती आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांचीही चर्चा झाल्याचं दिसून आलं. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी त्या त्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करण्याचं निश्चित केल्याचं दिसतंय. 27 जून रोजी उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ वाशिमचा दौरा आहे. त्या निमित्ताने ते नागपूरला जात आहेत. त्याच विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. त्यामुळे याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!