Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie Is Alankar Joshi: ‘मास्टर अलंकार’ (Master Alankar) म्हणून ओळखले जाणारे अलंकार जोशी (Alankar Joshi) हे 1970 च्या दशकातील हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Film Industry) अत्यंत लोकप्रिय चाईल्ड आर्टिस्ट (Child Artist) होते. शंभरहून अधिक सिनेमांमध्ये काम केलेल्या अलंकार यांनी आपल्या उपस्थितीने आणि दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘सीता और गीता’ (1972), ‘मजबूर’ (1974) आणि ‘दीवार’ (1975) यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमधील त्यांच्या भूमिकांनी त्यांना त्या काळातील सर्वात लाडक्या चाईल्ड आर्टिस्टपैकी एक म्हणून प्रस्थापित केलं. ‘दीवार’ सिनेमात ‘विजय’ या व्यक्तिरेखेचं बालपण साकारून, म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका करून, त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.
अमिताभ बच्चन यांनाही भावलेले मास्टर अलंकार (Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie Is Alankar Joshi)
प्रसिद्ध सिनेनिर्माते यश चोप्रा यांची योगायोगानं भेट झाल्यानंतर अलंकार यांना ‘दीवार’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. त्यांची बहीण आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या सांगण्यानुसार, ते यश चोप्रा यांना भेटण्यासाठी सिनेमाच्या सेटवर गेले होते. त्या भेटीदरम्यान, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची नजर अलंकार यांच्यावर पडली आणि त्यांनीच सुचवलं की, या मुलानं त्यांच्या ‘विजय’ या पात्राचं बालपण पडद्यावर साकारलं पाहिजे. यश चोप्रा यांनी याला संमती दिली आणि बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित पात्रांपैकी एका पात्राचं बालपण साकारण्यासाठी अलंकार यांची निवड झाली.
अमिताभ बच्चन यांना हुबेहुब केलं फॉलो (Master Alankar Play Role Of Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie)
‘फ्राइडे टॉकीज’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पल्लवी जोशी यांना सांगितलं की, मास्टर अलंकार अमिताभ बच्चन यांच्या हावभाव, त्यांचं चालणं, बोलणं हे सगळं लक्ष देऊन पाहायचे. जेव्हा अलंकार यांनी पाहिलं की, एका सीनमध्ये सिनिअर अभिनेता आपल्या शर्टला गाठ बांधत होते, त्यावेळी त्यांनी दिग्दर्शकांकडे अगदी तसंच करण्याची परवानगी मागितली. अगदी लहान-सहान गोष्टींकडे ते अगदी बारकाईनं पाहायचे. त्यांची हीच गोष्ट अनेक दिग्दर्शकांना भावली.
अभिनयापासून दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास (Master Alankar Struggle Story)
चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करताना अगदी लहान वयातच यशाचं सर्वोच्च शिखर गाठलेले मास्टर अलंकार यांना मोठं झाल्यावर मात्र भूमिका मिळणं अवघड होत गेलं. पल्लवी जोशीनं एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, त्यांनी मोठं झाल्यानंतर अभिनयाच्या संधी शोधण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण लवकरच त्यांना याची जाणीव झाली की, चाइल्ड आर्टिस्ट म्हणून त्यांना जे प्रेम आणि कौतुक मिळालेलं, ते मोठं झाल्यानंतर सहज मिळणार नाही. त्यानंतर त्यांनी मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शन आणि प्रोडक्शनमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वीसुद्धा करुन दाखवलं. पण, खरं तर मास्टर अलंकार यांची खरी आवड मात्र, काहीतरी वेगळीच होती.
फिल्म इंडस्ट्री सोडून निवडला वेदळा मार्ग अन् रचला इतिहास (Master Alankar Films In Bollywood)
फिल्म्समध्ये काम करण्यासोबतच मास्टर अलंकार यांनी आपल्या शिक्षणावरही लक्ष दिलं. प्रसिद्धीमधील चढ-उतार लक्षात घेऊन, त्यांनी पर्यायी करिअरची सोय असावी या उद्देशानं मनापासून अभ्यास केला. याच दूरदृष्टीमुळे ते पुढे सॉफ्टवेअर क्षेत्राकडे वळले.
आज टेक इंडस्ट्रीत दिग्गज (Who Is Alankar Joshi?)
कालांतरानं सिनेसृष्टीपासून दूर होऊन अलंकार अमेरिकेत स्थायिक झाले आणि त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल टाकलं. एका मित्रासोबत स्वतःची कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी दोन वर्ष एका सॉफ्टवेअर कंपनीत काम केलं. त्यांचा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. ‘फायनान्शियल एक्सप्रेस’च्या (Financial Express) माहितीनुसार, त्यांची सध्याची एकूण संपत्ती सुमारे 200 कोटी रुपये इतकी आहे. ते आता तीन दशकांहून अधिक काळापासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :