PM Svanidhi Yojana : सरकारची एकदम भन्नाट योजना, 90000 रुपयांचं कर्ज झटक्यात मिळणार, अर्ज कसा करावा? वाचा A टू Z – Marathi News | A loan of 90000 rupees on your Aadhaar card without a guarantee a windfall for 75 lakh beneficiaries have you availed of the benefit PM Svanidhi Yojana


आधार कार्डवर विना तारण 90,000 रुपयांचं कर्ज

PM Svanidhi Yojana: तुम्ही स्ट्रीट व्हेंडर, रस्त्यावरील विक्रेते असाल अथवा छोटे व्यावसायिक असाल तर पीएम स्वनिधी योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. या योजनेनुसार, पात्र लाभार्थ्यांना विना हमी एकूण 90,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. काही अटी आणि शर्तींवर युपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड आणि डिजिटल पेमेंटवर कॅशबॅकसारखी सुविधा पण मिळते. या योजनेतंर्गत क्रेडिट कार्डही देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.

75 लाखांपेक्षा अधिक लोकांना फायदा

पीएम स्वनिधी योजनेची सुरूवात जून 2020 रोजी झाली होती. ही योजना 31 मार्च 2030 रोजीपर्यंत सुरू असेल. या योजनेत आतापर्यंत 75.5 लाखांहून अधिक लोकांनी कर्ज घेतले आहे. त्यासाठी त्यांनी काही तारण ठेवलेले नाही. विना तारण कर्जाचा फायदा त्यांनी घेतला आहे. योजनेतंर्गत 17,800 कोटी रुपयांचे 1.12 कोटींहून अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. या योजनेतंर्गत 55 लाखांहून अधिक लाभार्थी हे डिजिटल पद्धतीने जोडण्यात आलेले आहेत. डिजिटल कॅशबॅक आणि व्याज सवलतीचा फायदा ही लाभार्थांनी उचलला आहे. त्यापोटी सरकारने जवळपास 800 कोटी रुपये वाटप केले आहे.

तीन टप्प्यात मिळते 90,000 पर्यंतचे कर्ज

या योजनेतंर्गत कर्ज रक्कम एकदाच मिळत नाही. ती तीन टप्प्यात मिळते. पूर्वी या कर्ज योजनेची एकूण मर्यादा 80,000 रुपये इतकी होती. ती वाढवून 90,000 रुपये इतकी करण्यात आली आहे. योजनेत अर्ज मंजूर झाल्यानंतर 15,000 रुपयांचा पहिला हप्ता देण्यात येतो. त्यानंतर 25,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज वाटप होते.

क्रेडिट कार्डही देण्यात येते

पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना युपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्डची सुविधा मिळू शकते. पण त्यासाठी अटी आणि शर्तींचे पालन करावे लागेल. कर्जाचा दुसरा हप्ता वेळेत फेड करणाऱ्या लाभार्थ्यांना 30,000 रुपये खर्च मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड देण्यात येते. डिजिटल पेमेंट केल्यावर कॅशबॅकचाही फायदा देण्यात येतो.

असा करा अर्ज

पीएम स्वनिधी योजनेसाठी मोठी कागदी कवायत करण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. हे कर्ज छोटे असल्याने, रक्कम छोटी असल्याने तिचा ईएमआय सुद्धा कमी असतो. या योजनेसाठी सरकारी बँकेत जाऊन अर्ज करावा लागतो. या योजनेत अर्ज भरून त्यात आवश्यक ती माहिती द्यावी लागते. अर्जासोबत आधार कार्डची प्रत जोडणे अनिवार्य आहे. बँक पडताळा केल्यानंतर कर्ज मंजूरीची प्रक्रिया पूर्ण करते. या योजनेत एकूण लाभार्थ्यांपैकी जवळपास 40 टक्के महिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *