मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता उर्वरित तालुक्यांमधील स्थितीवरही नजर ठेवली जात आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीची दखल घेत सरकारने दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांव्यतिरिक्त अन्य 19 तालुक्यांमध्ये तातडीने सर्वेक्षण (Survey) आणि ग्राउंड ट्रथिंग करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या 19 तालुक्यांमधील प्रमुख 5 पिकांचे 20 टक्के सर्वेक्षण करून प्रशासनाने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
Drought Survey 19 Talukas List : ‘या’ 19 तालुक्यांत होणार पीक पाहणी अन् सर्व्हे
शासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळ सर्वेक्षणासाठी निवडलेल्या 19 तालुक्यांची जिल्हानिहाय यादी खालीलप्रमाणे आहे:
नांदेड : मुदखेड, मुखेड आणि अर्धापूर
चंद्रपूर : जिवती, ब्रह्मपुरी आणि बल्लारपूर
गोंदिया : आमगाव, देवरी, सालेकसा आणि गोंदिया
वर्धा : कारंजा
भंडारा : मोहाडी आणि तुमसर
नाशिक : त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड
सातारा : पाटण
सांगली : शिराळा आणि वाळवा
Drought Bank Loan Recovery Strict Rules : कर्जवसुलीसाठी सक्ती करण्यास सक्त मनाई
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करत राष्ट्रीयकृत बँकांनी दुष्काळग्रस्त भागातील नियमांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच खासगी बँका (Private Banks) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी (DCCB) शेतकऱ्यांकडून किंवा नागरिकांकडून कर्जवसुली करताना कोणतीही जबरदस्ती अथवा सक्ती करू नये, याबाबत सहकार विभागाने कडक निर्देश जारी करावेत, असे आदेश बैठकीत देण्यात आले.
Animal Fodder Silo Management : चारा छावण्यांऐवजी ‘सिलो’ तंत्रज्ञान
आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने आत्तापासूनच नियोजन करण्यास सुरू केले आहे. पारंपारिक चारा छावण्यांऐवजी (Fodder Camps) प्रभावी पर्यायांचा अभ्यास केला जात आहे.
ज्या भागात अतिरिक्त चारा उपलब्ध आहे, तेथून तुटवडा असलेल्या भागात चारा पोहोचवण्यासाठी ‘सिलो’ (Silo) व्यवस्थापन प्रक्रियेचा वापर करून पुढील 15 दिवसांत ठोस उपाययोजना लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Tanker Water Supply Quarters Rules : पाणीपुरवठ्यासाठी लहान टँकरचा पुरवठा
गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवल्यास तिथे तातडीने टँकरद्वारे (Water Tankers) पाणी पुरवठा केला जाईल. मोठ्या क्षमतेचे टँकर जाण्यास रस्ते किंवा इतर अडचणी असल्यास लहान क्षमतेच्या टँकरचा वापर करून गावांमध्ये पाणी पोहोचवण्यास प्राधान्य दिले जाईल.
तसेच, दुष्काळ जाहीर झालेल्या भागात मदतकार्य गतिमान राहावे यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडू नये, असे सक्त आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील यंत्रणेने दिले आहेत.
ही बातमी वाचा:
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस…ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT