Horoscope Today 2 October 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 2 ऑक्टोबर 2026, आज शुक्रवारचा दिवस अत्यंत खास आहे, सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. आजचा हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या…
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस महिलांनी सर्व बाबतीत समतोल राखावा, श्रम घेण्याच्या बाबतीत इतरांपेक्षा थोडे कमीच पडाल
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस काम करण्याच्या ठिकाणाचे वातावरण तुम्हाला अनुकूल नसल्यामुळे कामावर त्याचा परिणाम होईल
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस कोणतेही निर्णय न घेता जैसे थे परिस्थिती ठेवा, नंतर निर्णय घ्या
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस आर्थिक लाभ मिळतील, त्यासाठी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्यास कामे मार्गी लागतील
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस प्रबळ आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारून टाकेल
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस महिलांना मुलांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल, समोरच्या माणसांची पारख करण्यात थोडे कमी पडाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस बेफाम तरुणाईला शिस्तीची किनार लावली तर ती जास्त शोभून दिसेल, त्यासाठी दोन पिढ्यांनी समजूतीचे धोरण स्वीकारावे लागेल
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस नवीन संकल्पनांचे स्वागत करून जुन्याशी त्यांची घातलेली सांगड खूप चांगले साधून जाईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस बौद्धिक कामे करणाऱ्यांना आज यश मिळेल, एखाद्या विषयात संशोधन करण्याचा वाव मिळेल
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात तडजोडीचे धरण स्वीकारावे लागेल, व्यवसायात नुसते ज्ञान असून चालणार नाही तर ते कोणत्या पद्धतीने वापरावे याचाही अभ्यास करावा लागेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात काही झाले तरी ताण जास्त घ्यायचा नाही हे ठरवून टाका, नाहीतर प्रकृती बिघडेल.
हेही वाचा :
October 2026 Lucky Zodiac Signs: ऑक्टोबर मध्ये 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट, गोल्डन Month! मंगळ-गुरू ग्रहांची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ, ज्योतिष…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)