IPL 2027 Trade Update : गुप्त बैठका अन् एका मोठ्या ट्रेडचा प्लॅन… IPL 2027 पूर्वी मुंबईच्या गोटात नेमकं शिजतंय काय?, रोहित शर्माला मिळणार नवा पार्टनर?


IPL 2027 Mumbai Indians Trade : आयपीएल 2027 च्या मेगा ऑक्शन आणि आगामी हंगामापूर्वी क्रिकेट जगतात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचे (MI) नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याचं भविष्य आता धोक्यात असल्याचं दिसत आहे. हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला अपेक्षित यश मिळालेले नाही, उलट तीनपैकी दोन हंगामात संघाची कामगिरी अत्यंत सुमार झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिक स्वतः इतर संघांमध्ये संधी शोधत असून, राजस्थान रॉयल्सचा (RR) धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि हार्दिक यांच्यात ट्रेड होण्याची दाट शक्यता आहे.

रोहित शर्माचा पर्याय म्हणून यशस्वी जैस्वाल मुंबईत? (IPL 2027 Mumbai Indians Trade)

‘रेवस्पोर्ट्ज’च्या अहवालानुसार, मुंबई इंडियन्स रोहित शर्माचा योग्य पर्याय म्हणून यशस्वी जैस्वालकडे पाहत आहे. यशस्वी हा मुंबईचाच खेळाडू असल्याने वानखेडे स्टेडियम त्याचा घरचा मैदान आहे. जर हार्दिक राजस्थानमध्ये गेला, तर यशस्वी मुंबईच्या गोटात सामील होऊ शकतो. धक्कादायक बाब म्हणजे, मुंबई इंडियन्स एका नव्या आणि तरुण संघाची बांधणी करत असल्याने, ते आगामी काळात सूर्यकुमार यादवलाही संघातून रिलीज करू शकतात.

तिलक वर्माकडे कर्णधारपद, मुंबईची महत्त्वाची बैठक (IPL 2027 Mumbai Indians Trade)

मुंबई इंडियन्स पुढील आठवड्यात एक महत्त्वाची बैठक घेणार आहे, ज्यामध्ये व्यवस्थापन आणि कोचिंग स्टाफच्या भविष्यावर चर्चा होईल. हार्दिक पांड्याने आधीच राजस्थान रॉयल्ससोबत चर्चा सुरू केल्याची चर्चा आहे. हार्दिक गेल्यास मुंबईच्या नेतृत्वाची धुरा युवा फलंदाज तिलक वर्मा याच्याकडे सोपवली जाऊ शकते, जो सध्या भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार देखील आहे.

हार्दिकच्या फिटनेसमुळे भारतीय संघही चिंतेत (IPL 2027 Mumbai Indians Trade)

केवळ मुंबई इंडियन्सच नव्हे, तर भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) देखील हार्दिक पांड्याच्या सततच्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. 2027 च्या विश्वचषकासाठी हार्दिक महत्त्वाचा खेळाडू असला, तरी त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. दुखापतीमुळे तो सलग दुसऱ्या मालिकेला मुकला आहे, तसेच आयपीएल 2026 मध्येही त्याने अनेक सामने खेळले नव्हते. यापूर्वी हार्दिक आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातही चर्चा सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याच्या बदल्यात हार्दिकला ट्रेड करण्याची चर्चा होती, मात्र आता राजस्थानचे पारडे जड दिसत आहे.

दिल्ली आणि लखनऊ संघातही मोठे बदल

आयपीएल 2027 पूर्वी केवळ मुंबईच नाही, तर इतर संघांमध्येही मोठे बदल पाहायला मिळतील. ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये पुन्हा पुनरागमन करू शकतो. केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार बनण्याची चर्चा आहे. तसेच कुलदीप यादव दिल्ली सोडून लखनऊ सुपर जायंट्समध्ये जाऊ शकतो. दिल्लीच्या कोचिंग स्टाफमध्ये सौरव गांगुली मुख्य प्रशिक्षक आणि युवराज सिंग फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळू शकतात.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi : आला, भांडला अन् सगळं संपवून गेला…; डगआऊटमध्ये शांत बसलेला वैभव सूर्यवंशीला पाहून कॅमेऱ्यात रडू लागला श्रीलंकन फॅन; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *