सहाच नाही आणखी खासदार होते, पण…; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं


पुणे : ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या खासदारांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व खासदार आज मुंबईत दाखल झाले असून एकनाथ शिंदेंच्या नंदनवन येथील बंगल्यावर उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करुन, पुढील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आपण ठाकरेंसोबतच आहोत, असे ठामपणे सांगणारे खासदारही आज शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे, ऑपरेशन टायगर सक्सेस झालं असून नेमकं हे कधी सुरू झालं, या ऑपरेशनचा दिग्दर्शक कोण, श्रीकांत शिंदेंनी (Shrikant shinde) नेमकी कशी भूमिका सांभाळली, याबाबत श्रीरंग बारणेंनी (Shrirang barne) गौप्यस्फोट केला आहे. 

ऑपरेशन टायगर सत्यात उतरल्यानंतर हे ऑपरेशन खासदार श्रीकांत शिंदेंनी केलं, असा गौप्यस्फोट लोकसभेतील शिंदे शिवसेनेचे प्रतोत आणि ऑपरेशन टायगरचे साक्षीदार खासदार श्रीरंग बारणेंनी केलाय. लोकसभेत आम्ही सर्व खासदार एकत्र बसतो, तेव्हा चर्चा होते, अनेकदा आम्ही कँटीनमध्ये एकत्र जेवायला बसतो, त्यातूनच ह्या ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली. आम्ही कुणालाही बळजबरी केली नाही, सर्वच खासदार स्वत:हून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्यासाठी आले आहेत. आता सहा खासदार आले आहेत, पण सहापेक्षाही जास्त खासदार येणार होते, पण बळजबरी करता येत नाही, असे म्हणत श्रीरंग बारणे यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार दिल्लीतील सर्व प्रक्रिया पार पाडून दुपारी मुंबईत परततील आणि आजचं या सहा खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होईल, असा दावा देखील बारणेंनी केला आहे. 

मंत्रि‍पदाबाबत एकनाथ शिंदेच सर्वकाही सांगतील

ऑपरेशन टायगरची सुरुवात कधी आणि कशी झाली? शिंदे शिवसेनेनं की ठाकरेंच्या खासदारांनी ऑपरेशन टायगरचा प्रस्ताव दिला? ठाकरेंच्या सेनेचे खासदार नेमकं कुठं आणि कधी भेटायचे? यानिमित्ताने केंद्रात ताकद वाढल्यानं, आता शिंदे शिवसेनेचे किती मंत्री वाढणार या सर्व प्रश्नांची उत्तरं बारणेंनी दिली आहेत. तसेच, मंत्रि‍पदाबाबत मी इथं बोलणं योग्य नाही, त्याबाबत एकनाथ शिंदेच सर्वकाही सांगितल, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा

राजेंद्र राऊतांच्या विजयानंतर जयुकमार गोरेंनी दंड दाखवले; मोहिते पाटलांना टोला, माळशिरसचा नेताही सांगितला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *