Omraje Nimbalkar and Eknath Shinde: ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी गोवर्धन वाडी येथील छोटेखानी सभेत आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शिंदे सेनेत जाणार असल्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून शेवटच्या क्षणापर्यंत ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना माघारी वळवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) सुरुवातीपासून शेवटपर्यंत केलेल्या चोख प्लॅनिंगमुळे ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकरांना माघारी वळविण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. एकनाथ शिंदे यांनी सोमवारीच दिल्लीत जाऊन सहा खासदारांसह लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतंत्र गटाची नोंदणी करवून घेतली होती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ठाकरे गटाचे सहा फुटीर खासदार कायदेशीर बंधनात बांधले गेले होते. मात्र, त्यानंतरही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जराही गाफील राहिले नाहीत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते हे शेवटच्या क्षणापर्यंत किती सतर्क होते, याची प्रचिती शनिवारी मध्यरात्री पुण्यात आली. (Maharashtra Politics News)
ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील या दोघांनी शनिवारी मध्यरात्री पुण्यात जाऊन ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली होती. वरुण सरदेसाई हे मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन आले होते. त्यांनी फोनवरुन ओमराजे निंबाळकर यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणेही करुन दिले. उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई हे तब्बल एक ते दीड तास ओमराजे निंबाळकर यांची समजूत काढत होते. मात्र, त्याचवेळी बाहेर शिंदे गटाचे कार्यकर्ते सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास दोन पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कार बाणेरमध्ये पोहोचल्या. या दोन्ही कार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू राहतात त्या इमारतीत पोहोचल्या. या गाड्यांमधून वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील बाहेर पडले. ही हालचाल ओमराजे निंबाळकर यांच्या इमारतीबाहेर तैनात असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही दिसली. ओमराजे निंबाळकर यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात असली तरी एकनाथ शिंदे यांनी आपले कार्यकर्ते 24 तास त्यांचा मुक्काम असलेल्या बाणेरच्या इमारतीबाहेर तैनात केले होते.
या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट शिंदे गटाचे पुण्यातील युवासेनेचे पदाधिकारी किरण साळी यांना सांगितले. त्यानंतर किरण साळे तातडीने आपली गाडी घेऊन ओमराजे निंबाळकर यांच्या भावाच्या घरी पोहोचले. ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या घरीही गेले. मात्र, आतमध्ये वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांचे ओमराजेंशी बोलणे सुरु असल्यामुळे त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. तेव्हा किरण साळी यांनी तातडीने एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर फोन फिरवला आणि एकनाथ शिंदे यांना या सगळ्याची खबर लागली. तोपर्यंत उद्धव ठाकरे हे ओमराजे निंबाळकर यांच्याशी फोनवरुन बोलले होते. एकनाथ शिंदे यांना या सगळ्याचा अंदाज असल्यामुळे कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई गेल्यानंतर शिंदे यांनी ओमराजे यांच्याशी फोनवरुन संवाद साधून ते आपल्या निर्णयावर ठाम राहतील, हे निश्चित केले.
आणखी वाचा
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story