डीके-डीकेच्या नाऱ्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन भलतेच संतापले! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना म्हणाले, ‘तुम्ही लोक बेकार आहात, इथं एकट्याची पूजा केली जात नाही, तर..’


Mallikarjun Kharge on DK DK slogans: बंगळूरुमध्ये एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले. कार्यक्रमादरम्यान, काही कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समर्थनार्थ ‘डीके-डीके’च्या घोषणाबाजीला सुरुवात केली. खर्गे यांनी मंचावरूनच त्यांना फटकारले. खरगे म्हणाले, “तुम्ही लोक बेकार आहात. हा वैयक्तिक कार्यक्रम नाही, हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे. येथे कोणत्याही नेत्याची पूजा केली जात नाही. आपण सर्वजण पक्ष मजबूत करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.” ही घटना काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांच्या शपथविधी सोहळ्यात घडली. घोषणाबाजी वाढू लागल्यावर खरगे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितले.

तर कार्यक्रमाचा उद्देशच निष्फळ ठरेल

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पक्ष प्रथम आहे. नेतेही पक्षाकडूनच ओळखले जातात. जर प्रत्येक गट आपल्या आवडत्या नेत्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करू लागला, तर कार्यक्रमाचा उद्देशच निष्फळ ठरेल. आपल्या 58 वर्षांच्या राजकीय अनुभवाचा संदर्भ देत ते म्हणाले की, अनेक नेत्यांनी कदाचित छोटे योगदान दिले असेल, पण पक्षाने त्यांना खूप काही दिले आहे. खरगे यांनी कार्यकर्त्यांनाही इशारा दिला. ते म्हणाले की, कार्यक्रमाचे संपूर्ण रेकॉर्डिंग उपलब्ध आहे आणि फुटेज पाहिल्यानंतर कारवाई केली जाईल. शिस्त आवश्यक आहे. घोषणाबाजी करणाऱ्यांचे फुटेज उपलब्ध आहे. ते पाहिल्यानंतर मी कारवाई करेन.  कार्यक्रमादरम्यान डी. के. शिवकुमार हे देखील कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. ते उभे राहिले आणि त्यांनी आपल्या समर्थकांना खाली बसून घोषणाबाजी थांबवण्याचा इशारा दिला.

देणग्यांवरून भाजपवर निशाणा

दरम्यान, खरगे यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांवरून भाजपवर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, मंदिरासाठी जमा झालेल्या निधीपैकी अंदाजे 5,000 कोटी रुपयांचा गैरवापर झाला आहे. रामाच्या नावाखाली लूटमार होते. कोट्यवधी रुपये लुटण्यासाठी राम मंदिर बांधले गेले होते का?

सिद्धरामय्यांच्या जागी डीके शिवकमार सीएम

2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार या दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचे होते. काँग्रेस नेतृत्वाने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले, तर शिवकुमार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर, ‘अडीच वर्षांच्या’ सूत्रावर चर्चा सुरू झाली. नोव्हेंबर 2025 मध्ये सिद्धरामय्या सरकारने सत्तेत अडीच वर्षे पूर्ण केल्यावर, शिवकुमार समर्थकांनी नेतृत्वबदलाची मागणी तीव्र केली. अखेरीस, 28 मे 2026 रोजी सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला. त्यानंतर, 3 जून रोजी डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *