IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल


IPL 2026 RCB vs GT धर्मशाला : आयपीएलच्या 19 व्या हंगामातील लीग स्टेजचे सामने संपले आहेत. प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स दाखल झाले आहेत. आयपीएलच्या क्वालिफायर-1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. हा सामना उद्या म्हणजेच 26 मे रोजी हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे होणार आहे. या सामन्याचा निकाल दोन्ही संघातील 5 खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असेल. 

भुवनेश्वर कुमार

आयपीएल 2026 मध्ये पर्पल कॅप सध्या आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारकडे आहे. भुवनेश्वर कुमारनं 14 मॅचमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत.  बंगळुरुच्या विजयाचा मार्ग सोपा करायचा असेल तर भुवनेश्वर कुमारला गुजरातच्या फलंदाजांना बाद करावं लागेल. धर्मशालामध्ये गुजरात टायटन्सच्या टॉप ऑर्डरला भुवनेश्वर कुमारनं धक्के दिल्यास बंगळुरुला फायदा होऊ शकतो. 

विराट कोहली 

आयपीएल 2026 मध्ये विराट कोहलीनं आतापर्यंत 50 च्या सरासरीनं 557 धावा केल्या आहेत. त्याचं स्ट्राइक रेट 163 पेक्षा अधिक राहिलं आहे. विराट कोहलीनं फलंदाजीच्या जोरावर आरसीबीला या हंगामात अनेक सामने जिंकवून दिले आहेत.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहलीच्या फलंदाजीच्या जोरावर गुजरातवर विजय मिळवू शकते.  फिल सॉल्ट आणि विराट कोहलीच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष असेल. 

साई सुदर्शन

गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शन या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यानं 14 डावांमध्ये 638 धावा केल्या आहेत.  क्वालिफायरमध्ये गुजरातच्या फलंदाजीची धुरा साई सुदर्शनवर देखील वर असेल. 

शुभमन गिल 

शुभमन गिलच्या नेतृत्वाच्या जोरावर गुजरात टायटन्सनं दमदार कामगिरी करत क्वालिफायर -1 मध्ये प्रवेश केला आहे. शुभमन गिलनं 13 डावात 616 धावा केल्या आहेत. गिलनं या हंगामात वेगात फलंदाजी केली आहे. आरसीबी विरुद्ध लीग स्टेजमधील सामन्यांमध्ये चांगली सुरुवात मिळून देखील गिल मोठी धावसंख्या उभारु शकला नव्हता. 

जोश बटलर 

जोश बटलरसाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम यशस्वी राहिला नसला तरी क्वालिफायर-1 मध्ये त्यानं वादळी फलंदाजी केल्यास गुजरात मोठी धावसंखा करु शकते. भुवनेश्वर कुमारनं यापूर्वी जोश बटलरला बाद केलं होतं.

या पाच खेळाडूंशिवाय आरसीबीत देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, कृणाल पांड्या तर गुजरातमध्ये मोहम्मद सिराज, राशिद खान आणि कगिसो रबाडा यांच्या कामगिरीकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. 

आयपीएल प्लेऑफ लढतींचं वेळापत्रक 

क्वालिफायर-1 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स,  26  मे – एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला
एलिमिनेटर- : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 27 मे – न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड
क्वालीफायर-2 : 29 मे – न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड
फायनल –  : 31 मे- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.  

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *