IPL मुंबई : आयपीएल प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबादर आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल झाले आहेत. 2026 च्या आयपीएलमधील आता प्लेऑफच्या लढती शिल्लक आहेत. आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स उद्या आमने सामने येणार आहेत. आयपीएलच्या 19 व्या हंगामातील लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंटस, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांचं स्पर्धेतील आव्हान संपलं आहे. टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग यानं क्रिकबझच्या एका व्हिडिओत पुढील हंगामात कोणत्या संघांनी कर्णधार बदलले पाहिजेत, यासंदर्भात भूमिका मांडली आहे.
वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
वीरेंद्र सेहवागनं आयपीएलच्या 10 कर्णधारांच्या नावं सांगितल्यानंतर कोणाला कर्णधारपदी ठेवावं आणि काढावं याबाबत उत्तरं दिली आहेत. हार्दिक पांडयाला कर्णधार पदावरुन काढावं, रजत पाटीदार, अक्षर पटेल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड,पॅट कमिन्स आणि श्रेयस अय्यर यांना कर्णधार पदी ठेवावं असं म्हटलं. तर, रियान पराग आणि अजिंक्य रहाणे यांना कर्णधार पदावरुन हटवावं असं म्हटलं. रिषभ पंतबाबत वीरेंद्र सेहवाग यानं 50-50 म्हणत शेवटी रिषभला कर्णधारपदावर कायम ठेवावं असं म्हटलं.
सेहवागच्या मते तीन संघांनी कर्णधार बदलावेत
वीरेंद्र सेहवागच्या व्हिडिओनुसार मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी कर्णधार बदलावे लागतील. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, लखनौ सुपर जायंटस, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स या संघांनी सध्या त्यांचे जे कर्णधार आहेत तेच कायम ठेवावेत.
Pant to stay as captain? 👀
Remove Hardik? 🔥
What should teams do after #IPL2026?@virendersehwag answers 🎙️ @GoogleIndia pic.twitter.com/azsKGaJ3i5
— Cricbuzz (@cricbuzz) May 25, 2026
प्लेऑफच्या लढती उद्यापासून
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वालिफायर-1 चा सामना धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ही मॅच मंगळवारी म्हणजेच 26 मे रोजी होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल ते थेट अंतिम फेरीच्या सामन्यात प्रवेश करतील. तर, क्वालिफायर-1 मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला क्वालिफायर-2 चा सामना खेळावा लागेल. क्वालिफायर-2 चा सामना 29 मे रोजी होणार आहे. एलिमिनेटरमध्ये विजयी झालेल्या संघासोबत क्वालिफायर-1 मधील पराभूत संघ खेळेल. एलिमिनेटरचा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.
आयपीएल प्लेऑफ लढतींचं वेळापत्रक
क्वालिफायर-1 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मे – एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला
एलिमिनेटर- : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 27 मे – न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड
क्वालीफायर-2 : 29 मे – न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड
फायनल – : 31 मे- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.
आणखी वाचा