Last Updated:
Thane Tree Collapsed : अंगावर झाड पडल्याने जखमी झालेल्या पांडुरंग भुवड यांचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ठाणे : मुंबईत झाड पडून नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना उघडकीस आल्या असतानाच, ठाणे शहरातही झाड कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर. डोक्यावर झाड पडल्याने जखमी झालेल्या पांडुरंग भुवड यांचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महावीर जैन हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. भुवड यांच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
पावसाळ्यात यंदा ठाण्यात झाडे पडण्याच्या अनेक घटन घडल्या आहे. ठाणे महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आठडाभरात झाडे पडल्याने तीन पुरुष आणि एक महिला जखमी झाली होती. सोमवारी (6 जुलै) ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाड पडल्याने लहान-मोठी नळ व पाइप दुरुस्तीची कामे करणारे पांडुरंग भुवड हे गंभीर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालयात केली होती गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
पांडुरंग भुवड हे धर्मवीर नगर येथील चाळीत पत्नी व मुलीसह राहत होते. भुवड हे नळ दुरुस्तीच्या कामासाठी सेवा रस्त्यावरून जात असताना आरटीओसमोर त्यांच्यावर झाड
कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नाराजी
एवढच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त सौरभ राव यांना भुवड यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र पहिल्याच पावसात ठाण्यात तीन जण जखमी झाले असून एका ठाणेकराला आपला जीव गमवावा लागला. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर सर्वसामान्यांमधून
नाराजीचे सूर उमटत आहेत.
झाडांच्या फांद्या तातडीने उचलण्याचे आदेश
रस्त्यांच्या कडेला छाटणी करून ठेवलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने उचलण्याचे आदेशही महापौरांनी दिले. पावसाळ्यात अशा फांद्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे छाटणी झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी फांद्या पडून राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
हे ही वाचा :
Mumbai,Maharashtra
ठाण्यात झाड कोसळून जखमी झालेल्या प्लंबर पांडुरंग भुवड यांचा उपचारादरम्यान मृत्यू , संपूर्ण कुटुंब पोरकं
