Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली


Ali Khamenei Home Video: इराण सरकारने दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा आणि त्यामुळे झालेल्या विध्वंसाचा एक अधिकृत व्हिडिओ प्रथमच प्रसिद्ध केला. राजधानी तेहरानमध्ये खामेनी यांचा अंत्यविधी सुरू असतानाच हा 35 सेकंदांचा व्हिडिओ समोर आला आहे. आज मशहदमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 28 फेब्रुवारी रोजी, अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी खामेनी मारले गेले. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आणि 40 अधिकारी मारले गेले, ज्यात खामेनींच्या 14 महिन्यांच्या नातीचाही समावेश होता. अमेरिका आणि इस्रायलने एकाच वेळी 35 क्षेपणास्त्रे डागली होती.

खामेनींच्या निवासस्थानाचे नाव “बैत-ए-रहबारी”  

खामेनींच्या निवासस्थानाचे नाव “बैत-ए-रहबारी” होते. हे मध्य तेहरानमध्ये असलेले एक अत्यंत सुरक्षित सरकारी संकुल होते. हे त्यांचे अधिकृत निवासस्थान, कार्यालय आणि सत्तेचे मुख्य केंद्र होते. बाहेरून पाहता, हे संकुल तुलनेने साधे दिसते, त्यात भव्य राजवाड्यांसारखी सजावट नव्हती.

  • इमाम खोमेनी हुसैनीया: हे संकुलातील एक मोठे सभागृह होते, जिथे खामेनी धार्मिक नेते, सरकारी अधिकारी, परदेशी प्रतिनिधी आणि जनतेला भेटत असत आणि महत्त्वाची भाषणे देत असत. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये हे सभागृह मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेले दिसत आहे.
  • अनेक इमारतींचे संकुल: हे केवळ एक घर नव्हते, तर त्यात कार्यालये, बैठकीच्या खोल्या, सुरक्षा सुविधा, निवासी क्षेत्रे आणि प्रशासकीय इमारतींचा समावेश होता. तिथे हजारो कर्मचारी काम करत होते.
  • अत्यंत उच्च सुरक्षा: संपूर्ण संकुल उंच भिंती, अनेक सुरक्षा घेरे आणि प्रतिबंधित प्रवेशाने वेढलेले होते. हे इराणमधील सर्वात सुरक्षित संकुलांपैकी एक मानले जात होते.

खामेनी हे इराणचे राष्ट्राध्यक्षही होते 

1989 मध्ये रुहोल्ला खोमेनी यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला खामेनी हे इराणच्या सर्वोच्च नेतेपदी होते. इराणमधील 1979 च्या इस्लामिक क्रांतीमध्ये खामेनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्या क्रांतीने शाह मोहम्मद रझा पहलवी यांना पदच्युत केले. इस्लामिक क्रांतीनंतर, 1981 मध्ये खामेनी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी आठ वर्षे या पदावर काम केले. 1989 मध्ये इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांच्या मृत्यूनंतर ते त्यांचे उत्तराधिकारी बनले.

अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर हल्ला केला

अमेरिकेने गुरुवारी पहाटे इराणवर हवाई हल्ल्यांची मालिका सुरू केली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) सुमारे 90 लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. सेंटकॉमच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली, किनारी निगराणी तळ, क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक स्थळे, नौदल तळ आणि लष्करी रसद पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले होते.

इतर महत्वाच्या बातम्या





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *