IND vs ENG: तु मला लाईक करतोस मग…तरुणीचा श्रेयसबद्दल खळबळजनक दावा, इंग्लंडमधील व्हिडिओ जोरदार व्हायरल – Marathi News | Shreyas iyer with fan girl video viral ahead of india vs england 4th t20


भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना आज रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी  आतापर्यंत वाईट पाहायला मिळाली. संघाला आता अनेक गोष्टी सुधरवण्याची गरज आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्या विजयाच्या शोधात आहे. भारतीय संघासाठी श्रेयसपर्व सुरु झाले असून त्याचा परिणाम तरी आतापर्यंत चांगला जाणवत नाहीये. आता कर्णधार श्रेयस अय्यर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. आता श्रेयसचा एका मुलीसोबतचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यासाठी संघ नॉटिंगहॅमहून ब्रिस्टलला जात असताना हे घडलं. खेळाडू सहसा चाहत्यांना ऑटोग्राफ देताना किंवा त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसतात, पण यावेळी मात्र गोष्टी थोड्या वेगळ्या होत्या. व्हिडिओवरून असे दिसते की, दोघांमध्ये खेळकर संवाद झाला. टीम इंडिया बसमध्ये जाण्यासाठी निघाली असताना चाहत्यांनी घेराव घातला. वैभव सूर्यवंशी चाहत्यांना ऑटोग्राफ देत होता. तितक्यात तिथे श्रेयसची एन्ट्री झाली आणि एका तरुणीने श्रेयसबद्दल जे बोलले ते ऐकून आता सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, तरुणीने श्रेयससोबत पुन्हा फोटो काढण्याचा हट्ट केला पण सॉरी म्हणत श्रेयस पुढं निघून गेला. मी ओळखते तुला, असं म्हणत तरुणने पुन्हा हट्ट केला. पण श्रेयसने काही मागे वळून बघेना. मी तुला ओळखते, तू मला लाईक करतो, असं म्हणत तरुणीने श्रेयसला बोलण्याचा प्रयत्न केला पण श्रेयस सरळ निघून गेला. हे ऐकून वैभवला आश्चर्य वाटले.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या दौऱ्यावर अद्याप विजय मिळवता आलेला नाही. भारताला सर्वप्रथम आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 0-2 असा पराभव पत्करावा लागला. यानंतर, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतही भारतीय संघ 0-2 ने मागे आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर इंग्लंडने पुढील दोन सामने जिंकले.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *