Shubman Gill on ICC 50-Over Format : आयसीसीच्या नव्या प्लॅनवर कर्णधार शुभमन गिल भडकला; वनडे क्रिकेटच्या भविष्यासाठी ठणकावून दिला मोठा सल्ला, नेमकं काय म्हणाला?


Shubman Gill Calls For Tri-Series To Revive 50-Over Format : टी-20 क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि जगभरातील विविध फ्रँचायझी लीगमुळे सध्या एकदिवसीय क्रिकेटच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच एडिनबर्ग येथे झालेल्या वार्षिक बैठकीत 50 षटकांचा हा सामना 40 षटकांचा करण्याचा विचार मांडला होता. मात्र, भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल याने आयसीसीचा हा विचार पूर्णपणे फेटाळून लावला आहे. वनडे क्रिकेटला गतवैभव मिळवून देण्यासाठी सामने कमी षटकांचे करण्याऐवजी तिंरगा (Tri-Series) किंवा चार देशांच्या मालिका (Quadri-Series) आयोजित कराव्यात, असा महत्त्वपूर्ण सल्ला गिलने दिला आहे.

40 षटकांचा प्रस्ताव शुभमन गिलने फेटाळला (Shubman Gill Calls For Tri-Series To Revive 50-Over Format)

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्यावर स्पष्ट मत मांडले. तो म्हणाला की, “मला वैयक्तिकरित्या असं वाटत नाही की वनडे क्रिकेट 40 षटकांचं केलं पाहिजे. षटकं कमी करणं हा यावरचा उपाय नाही. त्याऐवजी प्रेक्षकांची आणि चाहत्यांची या फॉरमॅटमधील उत्सुकता वाढवण्यासाठी आपण तिंरगा किंवा चतुष्कोणीय मालिका पुन्हा सुरू केल्या पाहिजेत.” 

2000 च्या दशकापर्यंत अशा बहुराष्ट्रीय मालिका क्रिकेट जगतात अत्यंत लोकप्रिय होत्या, मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे त्या हळूहळू बंद झाल्या. गिलच्या मते, अशा मालिकांमुळे वनडे क्रिकेटमधील चुरस आणि थरार पुन्हा जिवंत होईल. एकंदरीत, आयसीसीच्या 50 चे 40 षटक करण्याच्या शॉर्टकटवर नाराज होत, शुभमन गिलने थेट क्रिकेटच्या मूळ रचनेत बदल करून हा फॉरमॅट वाचवण्याचा सल्ला दिला आहे. आता गिलच्या या सल्ल्यावर आयसीसी आणि इतर क्रिकेट बोर्ड काय पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

2027 च्या विश्वचषकासाठी तयारी महत्त्वाची

2027 मध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील वनडे विश्वचषकाचा उल्लेख करत गिलने आगामी काळातील रणनितीवर प्रकाश टाकला. तो म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेत ज्या प्रकारच्या खेळपट्ट्या आणि परिस्थिती असेल, त्याचा अंदाज घेऊन संघ जोडणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या संघात जे खेळाडू खेळत आहेत, त्यांना तिथे मिळणाऱ्या परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे सोपे जाईल, या दृष्टीने आमची तयारी सुरू आहे. विश्वचषकाचा विचार करता प्रत्येक एकदिवसीय मालिका भारतीय संघासाठी प्रयोग करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे.

हे ही वाचा –

IND vs ENG 1st ODI : टीम इंडियातून 4 खेळाडू OUT; इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी अशी असेल भारताची चक्रावणारी Playing XI



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *