Sunetra Pawar NCP Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पक्षातील एका पदाधिकाऱ्याने नोटीस पाठवत त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचे म्हटले आहे. यावरून पक्षात सुरू असलेला अंतर्गत कलह समोर आलेला आहे. सच्चिदानंद सिंह (Sachidanand singh) यांनी स्वतःहून नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे, याचा देखील शोध घेतला जाईल, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून घेण्यात आलेली आहे. सध्या या प्रकरणी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार (Jay Pawar) काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics news)
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत प्रफुल पटेल- सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार पार्थ पवार असा अंतर्गत कलह पाहिला मिळाला होता. याच कलहाची ही पुढची आवृत्ती तर ही नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात निवडणुक आयोगासोबत प्रफुल पटेल यांनी केलेला पत्र व्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता. त्यावेळी प्रफुल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती तर सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते अशी माहिती लिहिण्यात आली होती. याला चार महिने उलटले तरी अद्याप या दोघांच्या पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम अद्याप पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही किंबहूना निवडणूक आयोगाला नव्याने पत्र व्यवहार केला आहे की नाही, याबाबत देखील स्पष्टता देखील देण्यात आलेली नाही. त्यामुळेच सध्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात वरिष्ठ पातळीवरील कोणत्या नेत्याचा सहभाग आहे का, याचा शोध राष्ट्रीय अध्यक्षांच्यावतीने घेतला जात आहे.
Sachidanand singh: कोण आहे सच्चिदानंद सिंह?
१) झारखंडचे प्रदेशाध्यक्ष
२) पक्षासोबत १५ वर्षापासून जोडलेले आहेत
३) अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना कर्जत येथे डिसेंबर २०२३ मधे सिंह यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली होती
४) २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या कार्यकारिणीत सिंह यांचा समावेश नाही
Maharashtra Politics: सच्चिदानंद सिंह यांचे आक्षेप काय आहेत?
१) 28 जानेवारीला अजित पवार यांचा मृत्यू झाला त्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 ला निवडणूक आयोगाला पक्षाकडून सुधारित घटना देण्यात आली ज्या मधे नव्याने राष्ट्रीय अध्यक्ष निवड होई पर्यंत प्रफुल पटेल जे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे अधिकार असतील असं नमूद करण्यात आलं होतं. आत्ता पर्यंत सुधारित संविधान पक्षासाठी लागू आहे.
२) सुधारित संविधानानुसार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांना सर्वाधिकार होते आणि त्यानुसार राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक प्रफुल पटेल यांनी बोलावणे गरजेचे होते मग पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली?
३) राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक 26 फेब्रुवारीला बोलवण्यासाठी 18 फेब्रुवारीला जे पत्र निवडणूक आयोगाला दिले त्यावर तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड हा मोठा प्रश्न आहे.
आणखी वाचा
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से