Hema Malini On Her Biopic: ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा कधी बनला, तर त्यांची भूमिका कोण साकारेल? हा प्रश्न अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनात होता. आता खुद्द हेमा मालिनी (Bollywood Actress Hema Malini) यांनीच या उत्सुकतेचा किंवा संभ्रमाचा अंत केलाय. त्यांनी अशा एका अभिनेत्रीचं नाव घेतलंय, जे ऐकून नेटकऱ्यांचंही असंच म्हणणं आहे की, या भूमिकेसाठी तिच सर्वोत्तम निवड असून तिच्यापेक्षा इतर कुणीच या भूमिकेला न्याय देऊ शकत नाही. आपल्या 60 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलंय की, जर त्यांच्यावर बायोपिक बनलाच, तर त्यात दीपिका पदुकोणनं मुख्य भूमिका साकारलेली त्यांना आवडेल.
हेमा मालिनी यांनी दीपिकाचंच नाव का घेतलं? (Hema Malini Chooes Actress For Her Biopic)
एका विशेष कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना त्यांच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आले, हेमा मालिनी यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता दीपिका पदुकोणचं नाव घेतलं. हेमा म्हणाल्या की, दीपिकाची इच्छा असल्यास ती ही भूमिका साकारू शकते. दीपिकाचं कौतुक करताना त्यांनी तिला सुंदर आणि प्रतिभावान म्हटलंय, तसेच ती या पात्राला नक्कीच न्याय देऊ शकेल, असंही नमूद केलंय. हेमा यांच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.
हेमा मालिनी आणि दीपिका पादुकोन यांच्यात खास कनेक्शन (Hema Malini Deepika Padukone Special Connection)
हेमा मालिनी आणि दीपिका पादुकोन यांच्यातलं सख्य काही कुणापासून लपलेलं नाही. 2017 मध्ये जेव्हा हेमा मालिनी यांची बायोग्राफी लॉन्च करण्यात आलेली, त्यावेळी त्यांनी दीपिका पादुकोनला यासाठी निवडलेलं. एवढंच नाहीतर, दीपिकाचा पहिला सिनेमा ‘ओम शांति ओम’मधली तिची ‘शांतिप्रिया’ ही भूमिका हेमा मालिनी यांच्या स्टार इमेजशी इंस्पायर्ड होती. अशातच जर हा बायोपिक कधीही बनला, तर दीपिकाचं नाव चाहत्यांसाठी अजिबातच धक्कादायक ठरणार नाही.

60 वर्षांच्या प्रवासातलं सर्वात मोठं वक्तव्य
हेमा मालिनी यांनी आपल्या 60 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा गौरव करणाऱ्या कार्यक्रमात बोलताना स्वतःच्या बायोपिकसाठी दीपिका पादुकोनचं नाव घेतलं. या प्रसंगी हेमा मालिनी यांनी आपल्या आईची, जया चक्रवर्ती यांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढली आणि प्रत्येक कठीण प्रसंगी त्या आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्याचं नमूद केलं. कुटुंबाचा पाठिंबा हीच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र, काही कारणांमुळे त्यांची मुलगी ईशा देओल या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही.
दरम्यान, हेमा मालिनी यांनी स्वतःच्या बायोपिकसाठी दीपिका पादुकोनचं नाव घेतल्यामुळे नेटकरीही खूश आहेत. दीपिकाच हेमा मालिनी यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकते, असं मत अनेकांनी व्यक्त केलंय. दीपिका पदुकोणनं ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘कल्की’ यांसारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर 1,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव