Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: आषाढी वारीला (Ashadhi Vari 2026) गालबोट लावणारी एक घटना काल (13 जुलै) सकाळी घडली आहे. जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) यांच्या पालखीतील ट्रकचा भीषण अपघात झाला. दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या असून या तीनही महिला सांगली जिल्ह्यातील होत्या.
सासवड-जेजुरी पालखी मार्गावरील बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे 500 मीटर अंतरावर दिंडीसोबत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत चार वारकरी गंभीर, तर तीनजण किरकोळ जखमी झाले. वारीसाठी ट्रक शिधा घेऊन जात होता. ट्रकचा ड्रायव्हर 70 वर्षे वयाचा होता. (Ashadhi Vari 2026 Warkari Accident)
सदर अपघाताचा पहिला व्हिडीओ समोर- (Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident Video)
सदर अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रक धडकण्याआधी वारकरी भजन-किर्तन, तुझ्यासाठी आलो मी देवा…म्हणत पायी चालत होते. तितक्यात मागून ट्रकने त्यांना धडक दिली. यानंतर सगळीकडे आक्रोश झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
तीन वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू- (Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident)
- नंदा पवार, वय 60, कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली
- माधवी राजाराम सलगरे, वय 55, मालगाव, ता. मिरज, जि. सांगली
- राजश्री शंकर भोसले, वय 55, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली
जखमी झालेल्या वारकऱ्यांची नावं- (Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident)
- अक्काताई बबन कोळी, रा.शिरगाव,जि. सांगली
- शांता शिवप्पा अलकोपर, रा.मिरजवाडी, जि. सांगली
- कासाबाई जगन्नाथ गस्ते, रा.आष्टा, जि. सांगली
- लक्ष्मी विठ्ठल गडदे, रा.नांगोळे,जि.सांगली
- शैलजा दिनकर जगताप, रा.कवलापूर, जि.सांगली
- मंगल विलास पाटील, रा.कवलापूर, जि. सांगली
मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत- (Devendra Fadnavis On Palkhi Warkari Accident)
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ झालेल्या अपघातात 3 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले असून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
संबंधित बातमी:
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया