IND vs ENG : पाय क्रीजबाहेर गेला नाही, तरी रवी बिष्णोईचा नो बॉल कसा? एका नियमामुळे टीम इंडियाचा पराभव! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, या पराभवाचा व्हिलन लेग स्पिनर रवी बिष्णोईला ठरवलं गेलं.

पाय क्रीजबाहेर गेला नाही, तरी रवी बिष्णोईचा नो बॉल कसा? एका नियमामुळे टीम इंडियाचा पराभव!
पाय क्रीजबाहेर गेला नाही, तरी रवी बिष्णोईचा नो बॉल कसा? एका नियमामुळे टीम इंडियाचा पराभव!

मॅनचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, या पराभवाचा व्हिलन लेग स्पिनर रवी बिष्णोईला ठरवलं गेलं. बिष्णोईने 17व्या ओव्हरमध्ये 29 रन दिले, ज्यामुळे मॅचचं चित्रच बदलून गेलं. या सामन्यात बिष्णोईने 3 बॅक फूट नोबॉल टाकले, ज्यातले 2 नोबॉल 17व्या ओव्हरमध्येच होते. रवी बिष्णोईचा पाय क्रीजच्या पुढे गेला नाही, मग तरीही नो बॉल का दिला गेला? असा प्रश्न काही क्रिकेट चाहत्यांना पडला, पण आयसीसीच्या एका नियमामुळे टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला.

काय आहे बॅकफूट नो बॉलचा नियम?

कोणत्याही बॉलरचा पुढचा पाय क्रीजच्या बाहेर जातो, तेव्हा अंपायर नो बॉल देतात ज्यामुळे बॅटरला फ्री हिट मिळतो. अगदी तसंच जर बॉलरचा पाय क्रीजच्या साईडलाईनच्या बाहेर पडला, तर त्याला बॅकफूट नो बॉल म्हणतात. बिष्णोई ज्या प्रकारे एँगल बनवून बॉलिंग करतो, त्यामुळे अनेकदा त्याचा मागचा पाय क्रीजच्या साईडलाईनला लागण्याचा धोका सर्वाधिक असतो.

आयसीसीच्या नियमानुसार फ्रंट फूट नोबॉल प्रमाणेच बॅकफूट नो बॉललाही फ्री हिट दिला जातो. पूर्ण सदस्य देशाच्या खेळाडूने एकाच टी-20 सामन्यात 3 नो बॉल टाकण्याची ही क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच वेळ होती.

बिष्णोईच्या ओव्हरमुळे फिरली मॅच

इंग्लंडला या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 49 रनची गरज होती, पण बिष्णोईने 17व्या ओव्हरमध्ये 29 रन दिल्या, त्यामुळे शेवटच्या 3 ओव्हरमध्ये इंग्लंडला विजयासाठी फक्त 20 रन हवे होते. या 20 रन इंग्लंडने 19व्या ओव्हरमध्येच पूर्ण केल्या. मॅच संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर यानेही रवी बिष्णोईची ओव्हर टीमच्या पराभवाला कारण ठरल्याचं मान्य केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *