Last Updated:
Mumbai Rain News: मुंबई आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्या कारणास्तव प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. पुढचे दोन दिवसही मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झालेले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्या कारणास्तव प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगडमधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी, मुंबई महापालिकेची घोषणा
भारतीय हवामान विभागाने (IMD) उद्या, सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी मुंबईसाठी सोसाट्याच्या वाऱ्यांसह ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उद्या, सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी मुंबईतील सर्व सरकारी, महानगरपालिका आणि खाजगी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यंत आवश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने सांगितले.
ठाण्याच्या शाळांनाही सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
भारतीय हवामान विभागाने दिनांक ५/७/२०२६ रोजी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ठाणे जिल्ह्यामध्ये दिनांक ६/७/२०२६ रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिलेला असून दिनांक ६ जुलै २०२६ रोजी ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
ज्याअर्थी, ठाणे जिल्ह्याचे सर्व क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार अतिवृष्टीची शक्यता विचारात घेऊन व तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (सर्व) ठाणे / जिल्ह्यातील महानगरपालिका / नगरपरिषद/नगरपंचायत यांचेकडील दुरध्वनीद्वारे प्राप्त परिस्थिती विचारांत घेता शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सखल भागांत पाणी साचण्याची घटना, तसेच नदी व खाडी किनारी पाणी साचून आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उक्त परिस्थिती नुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, बालवाडी, व शासकीय / निमशासकीय सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना दिनांक ०६/०७/२०२६ रोजी सुट्टी जाहीर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाचे मत झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, व माध्यमिक शाळांना दिनांक ६/७/२०२६ रोजी सुट्टी जाहीर करीत आहे. उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करण्यात यावी.
Mumbai,Maharashtra
Mumbai School Closed: मुंबईत पावसाचा धुमाकूळ, विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी, शाळा-कॉलेजबाबत मोठा निर्णय
