Mumbai: मानखुर्दच्या जनता नगर परिसरात भीषण दुर्घटना, चाळीचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

मानखुर्द येथील जनता नगर परिसरातील हनुमान मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या चाळ क्रमांक ५ मधील २ ते ३ घरांचा भाग कोसळले.

News18
News18

मुंबई : मानखुर्दच्या जनता नगर परिसरात एका तीन मजली (G+3) चाळीचा भाग अचानक कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जनता नगर परिसरातील हनुमान मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या चाळ क्रमांक ५ मधील २ ते ३ घरांचा भाग रात्री सुमारे ८:३० वाजण्याच्या सुमारास अचानक पत्त्यासारखा कोसळला. हा भाग कोसळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अद्याप ढिगाऱ्याखाली ४ ते ५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

घटना घडताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका सेवा आणि इतर संबंधित आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत ६ जणांना आपला जीव गमवावा लागला असून एका जखमीवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील एकूण जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबाबत प्रशासनाकडून अजूनही अधिकृत आणि सविस्तर माहिती मिळणे बाकी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *