देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या सुनेत्रा पवार, घडामोडींना वेग, थेट.. – Marathi News | Deputy Chief Minister Sunetra Pawar has arrived to meet Chief Minister Devendra Fadnavis


राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच काल शरद पवार थेट एकनाथ शिंदे यांच्या दालनात पोहोचले. शरद पवार दालनात आल्याचे कळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले आणि त्यांनी शरद पवार यांचा सत्कार केला. शरद पवार हे एकनाथ शिंदेंच्या दालनात आपल्या आमदारांची बैठक घेण्यासाठी आले होते. याबाबतच माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर ते आपल्या कॅबिनेट बैठकीसाठी निघून गेले. या भेटीचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आली आहेत. ज्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात जाणे पटले नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर थेट नाराजीही व्यक्त केली. राऊतांनी आपली नाराजीही बोलून दाखवली.

शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. यासोबतच ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांना तर थेट विधान परिषदेचे उपसभापती पदही देऊन टाकले. यादरम्यानच शरद पवार शिंदेंच्या दालनात पोहोचल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्ली दाैऱ्यावर होते. अमित शाह यांच्यासोबत काही तास देवेंद्र फडणवीसांची बैठक सुरू होती.

यादरम्यानच आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना चांगलाच वेग आला. थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. अचानकच सुनेत्रा पवार या फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याने घडामोडींना वेग आला. दोन दिवसांपूर्वीच फडणवीस हे दिल्ली दाैऱ्यावर होते. अमित शाह यांच्यासोबत त्यांची बंद दाराआड चर्चा झाली.

शिवसेना ठाकरे गटातील अजूनही काही आमदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक आमदारांची मातोश्रीवर घेतली. शरद पवार यांच्याही पक्षातील काही आमदार आणि खासदार फुटणार असल्याची चर्चा होती. यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी भाष्य केले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केला जाणार आहे. राज्यातील अनेक चेहऱ्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *