Trinamool Congress: सक्तवसुली संचालनालयाने (ED) तृणमूल काँग्रेसच्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमधील (HDFC बँक) तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. ही कारवाई प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत करण्यात आली आहे. कोलकाता सायबर पोलिसांनी (Bidhannagar) आर्थिक गैरव्यवहार, बेकायदेशीर पैसे गोळा करणे आणि संशयास्पद निधी तृणमूल काँग्रेसच्या बँक खात्यांमध्ये वळवणे या संदर्भात दाखल केलेल्या FIR च्या आधारे ED ने हा तपास सुरू केला होता.याच तपासाचा भाग म्हणून ईडीने कोलकाता आणि आसपासच्या परिसरातील विमान वाहतूक (Aviation) क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या ‘केअरवेल ग्रुप ऑफ कंपनीज’ (Carewell Group of companies) च्या 5 ठिकाणांवर छापेमारी केली होती.
फुटीर गटाचाही पैशावर दावा
या बँक खात्यांवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. एक गट माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आहे, तर दुसरा गट विरोधी पक्षनेते रिताब्रता बॅनर्जी यांचा आहे. दोन्ही गटांनी या खात्यांवर आपला हक्क सांगितला आहे. यापूर्वी कोलकाता पोलिसांनी बँकांना ही तीन खाती गोठवण्यास सांगितले होते. या प्रकरणावर कलकत्ता उच्च न्यायालयात (Calcutta High Court) सुनावणी सुरू असून, न्यायालयाने ही खाती गोठवण्याच्या एवढ्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
विमान आणि हेलिकॉप्टर खरेदीसाठी निधीचा वापर
एप्रिल 2023 ते जून 2026 दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या बँक खात्यांमधून सुमारे 160 कोटी रुपये ‘केअरवेल एव्हिएशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ आणि तिच्याशी संबंधित कंपन्यांकडे वर्ग (Transfer) करण्यात आले.या केअरवेल एव्हिएशनने 2023 ते 2026 दरम्यान ‘एम्ब्रेअर लेगसी 600’ (Embraer Legacy 600) विमान आणि ‘ऑगस्टा 109 ग्रँड न्यू’ (Augusta 109 Grand New) हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी दुसऱ्या एका नवीन कंपनीकडे 82.96 कोटी रुपये वळवले. या खरेदीसाठी एकूण 112 कोटी रुपये वापरण्यात आले. हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी 2023 मध्ये केमन आयलँड्स (Cayman Islands) येथील एका संस्थेकडून १.७ दशलक्ष डॉलर्स (1.7 million USD) चे असुरक्षित कर्ज (Unsecured loan) देखील घेण्यात आले होते.
पक्षाच्याच पैशातून खरेदी आणि पक्षालाच भाड्याने
ही विमाने आणि हेलिकॉप्टर्स तृणमूल काँग्रेसच्या (AITC) निधीतून खरेदी केली गेली असली, तरी ती नंतर तृणमूल काँग्रेस पक्षालाच भाड्याने (Rent) देण्यात आली. विमान आणि हेलिकॉप्टर वापरण्याच्या नावाखाली पक्षाकडून पुन्हा या कंपन्यांना मोठी रक्कम वर्ग करण्यात आली. या कथित संशयास्पद व्यवहारांचा खरा उद्देश काय होता, याचा तपास सध्या ईडी करत आहे.
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून