ENG vs IND : 3 सामने-16 खेळाडू, वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम जाहीर, पहिला सामना केव्हा? – Marathi News | Eng vs ind england announced 16th member squad for odi series 2026 against india see harry brook will lead know details


इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात सध्या टी 20i मालिका (England vs India T20i Series 2026) खेळवण्यात येत आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे वाया गेला. पावसामुळे दुसऱ्या डावातील खेळ झाला नाही. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. आता उभयसंघातील दुसरा सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. त्याआधी इंग्लंडच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडने इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी (India Tour Of England 2026) टीम जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

3 सामने आणि 1 मालिका

उभयसंघातील या एकदिवसीय मालिकेला 14 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर 19 जुलैला तिसरा आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना हा 16 जुलैला होणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तसेच मुख्य संघात अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये जोफ्रा आर्चर, जेकब बेथल, बेन डकेट आणि विल जॅक्स यांचा समावेश आहे.

इंग्लंड-इंडिया वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 14 जुलै एजबेस्टन, दुपारी साडे 3 वाजता

दुसरा सामना, 16 जुलै कार्डीफ, संध्याकाळी साडे 5 वाजता

तिसरा आणि अंतिम सामना, 19 जुलै, लॉर्ड्स, दुपारी साडे 3 वाजता

टीम इंडिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंड : हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, सॅम कुरन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, जो रूट आणि जोश टंग.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल,अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *