ठाणे : राज्यात पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या(Rain) सरी कोसळत असून अनेक ठिकाणी पडझडही झाल्याचं दिसून येत आहे. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी 4 जुलै 2026 रोजी ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिवार, 4 जुलै 2026 रोजी केडीएमसी हद्दीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा (School) तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे रायगड जिल्ह्यात आंबेनळी घाट पुढील 4 दिवस बंद करण्या आला आहे.
रायगड जिल्ह्यातून जाणारा, पोलादपुर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड मध्ये कोसळणाऱ्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला. त्यानुसार, आजपासून पुढे 6 जुलैपर्यंत आंबेनळी घाटातून होणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार असून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहे.
केडीएमसी हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी
मुंबई हवामान विभागाच्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यात आजपर्यंत कालावधीत ऑरेज होता आता, 4 आणि 5 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सदर कालावधीत अतिवृष्टी, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट तसेच काही भागांत पाणी साचणे, पुरपरिस्थिती निर्माण होणे किंवा वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शनिवार 4 जुलै रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या (राज्य मंडळ, सी.बी.एस.ई. आय.सी.एस.ई. सी.आयई) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तसेच महाविदयालय व शाळा व्यवस्थापनाने यापुढील कालावधीत परिस्थितीचा विचार करुन विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुरक्षिततेस धोका निर्माण होणार नाही याबाबत योग्य त्या उपाययोजना करावयाच्या आहेत.
हेल्पलाईन क्रमांक जारी
बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916
पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873
ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827,
ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101
पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42
हेही वाचा
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग