सुटे पाश्चराईज्ड दूध आता बंद! तुकाराम मुंढेच्या नव्या नियमाने विक्रेत्यांची झोप उडाली, काय आहे नवे नियम? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

News18
News18

IAS Tukaram Mundhe:  तुम्हीही घरी दूधवाल्याकडून सुट्टे पाश्चराईज्ड दूध घेता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आणि तुमच्या दूधवाल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणताही दूधवाला  सरकारी परवान्याशिवाय  सुटे पाश्चराईज्ड घरोघरी दूध पोहोचवू शकणार नाही. कारण सुटे दूध फक्त परवानाधारक विक्रेत्यांकडून घेण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी काढला आहे. तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील कडक आदेश जारी केले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी दुधातील भेसळ संदर्भात काही आदेश दिले आहेत. तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांकडे वळवला असून आदेशासंदर्भात पत्रकार परिषदेतून सविस्तर माहिती दिली आहे. सुरक्षित, शुद्ध सकस आणि भेसळमुक्त दूध उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदशक सूचना जारी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दूध प्रक्रियेतील इको सिस्टम, शेतापासून ते ताटापर्यंत यावर काम करावं लागणार आहे, त्यासाठी काही नियम लागू केले आहेत.

सुटे पाश्चराईज्ड दूध आता बंद

  • पाश्चराईज्ड आणि प्रमाणित दूध फक्त सीलबंद
  • छेडछाड-प्रतिरोधक पॅकमध्ये
  • उघड्या कॅनमधून ओतून दिलेले सुटे दूध बेकायदेशीर
  • सुटे कच्चे दूध फक्त परवानाधारक विक्रेत्याकडूनच
  • कच्च्या दुधावर फलक: कच्चे दूध सेवनापूर्वी उकळावे

तुकाराम मुंढे काय म्हणाले? 

तुकाराम मुंढे म्हणाले, सेव्ह फूड सेव्ह ड्रग ही मोहीम आपण हाती घेतलं आहेत. दुधातील भेसळ, कृत्रिम दूध या सगळ्यासंबंधी गाईडलाइन्स दिल्या आहेत. दूध उत्पादकांना पॅकर्स पासून सेलर पर्यत 8 प्रकारचे नियम सगळ्यांना लागू आहेत . दूध संललन केंद्र, दूध कुलिंग सेंटर, किरकोळ विक्रेते, बल्क दूध विक्री करणारे, पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज, आईस्क्रीम विक्रेते यां सगळ्यांना हे नियम लागू असेल.

नवी नियमावली  जारी 

राज्यभर करण्यात आलेल्या तपासण्या, निरीक्षणे, नमुना विश्लेषणे व अंमलबजावणी कारवाईतून दूध पुरवठा साखळीच्या विविध टप्प्यांवर काही गंभीर त्रुटी सातत्याने निदर्शनास आल्या. या त्रुटी केवळ एखाद्या जिल्ह्यापुरत्या मर्यादित नसून संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये एकसमान अनुपालन व्यवस्था आवश्यक असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आम्ही नवी नियमावली आणत असल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा :
मराठी बातम्या/महाराष्ट्र/

सुटे पाश्चराईज्ड दूध आता बंद! तुकाराम मुंढेच्या नव्या नियमाने विक्रेत्यांची झोप उडाली, काय आहे नवे नियम?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *