ICC Women’s T20 World Cup: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात जेतेपदासाठी लढत, विजयी संघाला मिळणार इतके कोटी – Marathi News | ICC Womens T20 World Cup final Australia and England clash for the title winning team to receive 22 crore


ICC Women’s T20 World Cup: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात जेतेपदासाठी लढत, विजयी मिळणार इतके कोटीImage Credit source: Getty Images

ICC Women’s T20 World Cup 2026 Prize Money: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा आमनासामना होणार आहे. दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारताना एकही सामना गमावलेला नाही हे विशेष.. त्यामुळे दोन्ही संघ तूल्यबळ असून कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सहा वेळा जेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पराभूत केलं. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने दक्षिण अफ्रिकेला मात दिली. आता या दोन्ही संघात ऐतिहासिक आणि हायव्होल्टेज सामना 5 जुलैला लॉर्ड्स मैदानात होणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने प्राईज मनी वाढवलं आहे. त्यामुळे दोन्ही संघ मालामाल होणार हे नक्की आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने या स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम वाढवली आहे.

चॅम्पियन संघाला मिळणार इतके कोटी

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. तसेच नाणेफेकीचा कौल अर्धा तास आधी म्हणजेच 7.30 वाजता होईल. दोन्ही संघ या स्पर्धेत जबरदस्त खेळले आहेत. त्यामुळे हा सामना तूल्यबळ होणार यात काही शंका नाही. इंग्लंडचं होमग्राउंड असल्याने काही अंशी फायदा मिळेल. पण ऑस्ट्रेलिया चिवट खेळीसाठी ओळखली जाते. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सहा वेळा जेतेपद मिळवलं आहे. तर इंग्लंडने एकदाच जेतेपद मिळवलं आहे. आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाला ट्रॉफीसह 2.34 मिलियन डॉलर म्हणजेच 22 कोटीहून अधिकची रक्कम मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला 1.17 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 11 कोटी मिळणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यापैकी कोणता संघ बाजी मारतो? याकडे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंड संघ: नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), डॅनिएल गिब्सन, एमी जोन्स, लॉरेन बेल, अॅलिस कॅप्सी, टिली कोर्टने-कोलमन, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टन, लॉरेन फायलर, फ्रेया केम्प, हेदर नाइट, लिन्से स्मिथ, इसी वाँग, डॅनी वायट-हॉज.

ऑस्ट्रेलिया संघ: सोफी मोलिनक्स (कर्णधार), टाहलिया मॅकग्रा, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, जॉर्जिया वोल, ॲनाबेल सदरलँड, मेगन शट, एलिस पेरी, बेथ मूनी, फोबी लिचफिल्ड, अलाना किंग, ग्रेस हॅरिस, लुसी हॅमिल्टन, किम गार्थ, निकोला केरी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *