Dhurandhar Movie Threat National Security: ‘धुरंधर’मुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका? उच्च न्यायालयाचे मंत्रालयाला चौकशीचे निर्देश; लष्करातल्या जवानाची याचिका


Dhurandhar Movie Threat National Security: ‘धुरंधर’ (Dhurandhar) आणि ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2) सिनेमानं फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला. पण, हाच सिनेमा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करताना ठरू शकतो, असं म्हटलं जात आहे. त्याचं झालं असं की, दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) एका जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे, ज्यात केंद्र सरकारनं (Central Government) माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्ड (CBFC) यांना ‘धुरंधर’ सिनेमातील राष्ट्रीय चिंता निर्माण करणारी काही दृश्य वगळण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाचं म्हणणं आहे की, याचिकाकर्त्यानं उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि त्यावर योग्य पद्धतीनं तोडगा काढणं आवश्यक आहे.

‘धुरंधर’ विरोधातली याचिका एका लष्करी जवानानं स्वतः न्यायालयात हजर राहून दाखल केली होती. याचिकाकर्त्याचा दावा आहे की, सिनेमातील काही दृश्य, ज्यात लष्कर आणि सुरक्षा दलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या रणनीती, कार्यपद्धती आणि संवेदनशील ठिकाणांचं स्पष्ट चित्रण आहे, ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की, जरी सिनेमाला ‘काल्पनिक’ म्हटलं जात असलं तरी, असे सीन्स राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि अखंडतेच्या हिताची मानली जाऊ शकत नाहीत.

सिनेमांचा प्रभाव पडतो, त्यामुळे सेन्सॉरशिप आवश्यक: उच्च न्यायालय

सुनावणीदरम्यान, न्यायालयानं असंही मत व्यक्त केलंय की, सिनेमांचा प्रभाव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही. एक उदाहरण देताना खंडपीठानं म्हटलंय की, जर एखाद्या सिनेमात आत्महत्या करण्यापूर्वी ऑनलाईन पद्धती शोधण्यासारखी दृश्य तपशीलवार दाखवली असतील, तर असं चित्रण ‘हेतुपूर्ण’ आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. न्यायालयानं म्हटलं की चित्रपटांचा प्रभाव नाकारता येत नाही आणि म्हणूनच सेन्सॉरशिप आणि मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत.

उच्च न्यायालयाचं म्हणणं काय? 

याचिकाकर्त्यानं उच्च न्यायालयाला कळवलंय की, त्यानं 23 मार्च 2026 रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, सेन्सॉर बोर्ड यांना सिनेमातील अनेक सीन्सवर आक्षेप घेत एक सविस्तर निवेदन पाठवलं होतं. याचिकाकर्त्यानं असंही सांगितलंय की, त्यानं या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. आपल्या आदेशात, न्यायालयानं म्हटलं की, सक्षम प्राधिकरणानं या प्रकरणाचा विचार करावा आणि आवश्यक वाटल्यास ‘सुधारात्मक कारवाई’ करावी. याशिवाय, घेतलेल्या निर्णयाची माहिती याचिकाकर्त्याला देण्यात यावी. यासह, न्यायालयानं जनहित याचिका निकाली काढली आहे.

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ची कमाई

‘धुरंधर’ डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने जगभरात 1,307.35 कोटी आणि भारतात 840.20 कोटींची कमाई केली. त्याचा सिक्वेल, ‘धुरंधर 2’, 18 मार्च 2026 रोजी पेड प्रिव्ह्यूसह थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आणि तो अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या सिनेमानं रिलीजच्या 62 व्या दिवशी, त्याने केवळ 408 शोमधून 22 लाख कमावले. आतापर्यंत, त्यानं भारतात 1,371.95 कोटींची कमाई केली आहे आणि नेट  कलेक्शन 1,146.35 कोटी आहे. त्यानं जगभरात 1,798.62 कोटींची कमाई केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Amaal Malik On Industry Dark Side: वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, ‘बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं…’

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *