‘तो माझा मुलगा नाहीच अन्…’, सावत्र आईसोबत कसं आहे शाहिद कपूर याचं नातं? सुप्रिया पाठक यांचा मोठा खुलासा – Marathi News | Shahid Kapoor relationship with step mother supriya pathak pankaj kapoor second wife


Shahid Kapoor : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे कमी पण त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता अभिनेता शाहिद कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. शाहिद कपूर हा वडिला पंकज कपूर यांची पहिली पत्नी नीलिमा आझमी यांचा मुलगा आहे. 1984 मध्ये पंकज आणि नीलिमा यांच्या घटस्फोटानंतर 1988 मध्ये पंकज यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्यासोबत दुसरा संसार थाटला. पंकज आणि सुप्रिया यांची दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव सना कपूर आणि मुलाचं नाव रुहान कपूर असं आहे. शाहिद कपूर याची सावत्र आई असल्यामुळे सुप्रिया पाठक यांना कायम दोघांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला जातो. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुप्रिया यांनी शाहिद यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला आहे.

शाहिद याच्यासोबत कसं आहे सावत्र आई सुप्रिया पाठक यांचं कनेक्शन?

सुप्रिया पाठक यांच्यानुसार, शाहिद याच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहे. ‘आम्ही दोघांनी कधीच आमच्यामध्ये घट्ट नातं तयार करण्याचा प्रयत्न केला नाही आणि हे स्वाभाविक आहे. सांगायचं झालं तर, शाहिद माझा मुलगा नाही आणि ही गोष्ट माझ्या मनात देखील कधी आली नाही. माझ्यासाठी तर तो माझा मुलगाच आहे. त्यामुळे सावत्र मुलगा म्हणून प्रश्न विचारल्यानंतर मला विचित्र वाटतं..’

‘ज्याप्रकारे माझी लेक सना आणि मुलगा रुहान आहे, त्याचप्रकारे शाहिद देखील माझा मुलगा आहे.’, ईशान खट्टर याच्यासोबत असलेल्या नात्यावर सुप्रिया म्हणाल्या, ‘त्याच्याबद्दल मला फार काही माहिती नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल मी फार काही बोलणार नाही. कारण आम्ही दोघेही एकमेकांना फार चांगलं ओळखत नाही. ‘, असं देखील सुप्रिया पाठक म्हणाल्या.

शाहिक कपूर याची आई नीलिमा यांचं दुसरं लग्न

पंकज कपूर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर नीलिमा यांनी 1990 मध्ये अभिनेते राजेश खट्टर यांच्यासोबत लग्न केलं आणि मुलगा ईशान याचं जगात स्वागत केलं. सांगायचं झालं तर, सावत्र भावंडांसोबत शाहिद याचे चांगले संबंध आहेत. ईशान याच्यासोबत शाहिद याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *