Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना ‘हे’ 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, ‘अजितदादा…’


बीड :  माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांचा 15 जुलै रोजी वाढदिवस (Dhananjay Munde Birthday) आहे आणि हा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रमाने (Dhananjay Munde Birthday) साजरे करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार आणि परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेला केले आहे सोशल मीडियावर पोस्ट करून केले आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत जनतेला हे आवाहन केलं आहे.(Dhananjay Munde Birthday)

Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

पोस्टमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde Birthday) म्हणालेत, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार आणि परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेला विनम्र आवाहन…जीवनात काही क्षण असे असतात की, ते कोणताही उत्सव साजरा करण्यापेक्षा संवेदना आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतात. दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने आपण सर्वजण अत्यंत दुःखी आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेसाठी अखंड झटणारा, विकासाला दिशा देणारा एक मोठा आधारवड आपण गमावला आहे. त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन करत असताना कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करणे माझ्या मनाला पटत नाही.”(Dhananjay Munde Birthday)

“याचवेळी आपल्या परळी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण परिसरात अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेच्या छायेत आहेत. पावसाच्या प्रत्येक सरीकडे आशेने पाहणारा शेतकरी आजही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अशा वेदनादायी परिस्थितीत माझा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याचा विचारही मनाला शिवत नाही. म्हणूनच दि. १५ जुलै, माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज, स्वागत कमानी, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुका किंवा उत्सवी कार्यक्रम आयोजित करू नयेत, ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे.”(Dhananjay Munde Birthday)

वाढदिवस साजरा करण्याऐवजी माझ्यावरील आपल्या प्रेमाचे रूप समाजसेवेत दिसू द्या…
🌱 एक तरी वृक्ष दत्तक घ्या आणि त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारा.
📚 आपल्या गावातील किंवा प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावा.
🌾 अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे रहा.
📖 वाचनालयांना पुस्तके भेट द्या, कारण ज्ञानदान हीच सर्वात मोठी सेवा आहे.
🤝 एखाद्या गरजू कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा प्रयत्न करा.

“माझ्यासाठी वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा दिवस नाही; तर समाजाचे ऋण फेडण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. तुम्ही केलेला प्रत्येक समाजोपयोगी उपक्रम, प्रत्येक मदतीचा हात आणि प्रत्येक सेवाभावाचे कार्य हीच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान भेट असेल.समाजसेवेच्या माध्यमातून दिवंगत स्व. अजितदादांना खरी आदरांजली अर्पण करूया…धन्यवाद!” असंही आवाहन त्यांनी केलं आहे.(Dhananjay Munde Birthday)

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *