6 महिला यायच्या आणि… रात्रीच नव्हे दिवसाही रंगायचा खेळ, हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पनवेलमध्ये मोठी खळबळ – Marathi News | Navi Mumbai Police Bust Panvel Prostitution Racket, Rescue 6 Women


हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

नवी मुंबईतील पोलिसांच्या गुन्हे शाखेने पनवेल परिसरात सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून एका नामांकित हॉटेलवर छापा टाकला आणि या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. या कारवाईमुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

बनावट ग्राहक पाठवून रचला सापळा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील ‘हॉटेल राहुल पार्क फॅमिली रेस्टॉरंट गार्डन बार अँड लॉजिंग-बोर्डिंग’ येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा संशय होता. काही महिला फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही यायच्या आणि तिथे गैरकृत्य चालायची अशी माहिती मिळाली होती. त्याची खातरजमा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून आरोपींशी संपर्क साधला. व्यवहार निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने लॉजवर छापा टाकत संपूर्ण कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात या महिलांना विविध आमिषे दाखवून किंवा दबावाखाली देहव्यापारात ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून पीडित महिलांचे जबाब नोंदवून त्यांना आवश्यक मदत आणि संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तिघांना अटक, लॉजचा मालक फरार

या प्रकरणात लॉज व्यवस्थापक गामा नंदू सोनकर, कॅशिअर दीपू उमेश यादव आणि वेटर प्रियंशु रविदास यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर लॉजचा मालक रमेश शर्मा हा फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके काम करत आहेत. पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 13 जुलै 2026 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच पीडित महिलांना या जाळ्यात कसे ओढण्यात आले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेण्याबरोबरच आर्थिक व्यवहार, लॉजमधील नोंदी आणि इतर संबंधित व्यक्तींची चौकशीही केली जात आहे. नवी मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे पनवेल परिसरातील अवैध कारवाया आणि देहव्यापार विरोधातील मोहिमेला वेग आला असून, अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *