Sanjay Raut: मुंबईत रामरक्षा आंदोलन केल्यानंतर आता नागपुरात आंदोलन शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात येणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेने रामरक्षा आंदोलन जे सुरू केले त्याचा पहिला टप्पा मुंबईत पार पडला. दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला साडेचार वाजता होईल. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि असंख्य आमचे मुंबईतले नेते व विदर्भातले कार्यकर्ते यात सहभागी होतील, असे राऊत म्हणाले.
डाकू आणि चोर आजही अयोध्येमध्ये
संजय राऊत म्हणाले, 18 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख नागपूरला रामरक्षा आंदोलनात सहभागी होतील. राम मंदिर लूट प्रकरणामध्ये देशात असंतोष आहे, आजही मुख्य आरोपी पकडले गेले नाहीत, आजही लूट सुरू आहे. स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर आजही अयोध्येमध्ये आहेत. त्यांनी राम मंदिराची आणि रामाची पूर्ण बदनामी केल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.
तर चंद्रशेखर बावनकुळे सीएम होतील
राऊत यांनी सांगितले की, ज्येष्ठ मंत्री म्हणून जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले, तर 100 टक्के मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करतील, हे माझं आकलन आहे. फडणवीसांनी 2029 पूर्वी पीएम व्हावं अशीही टिप्पणी त्यांनी केली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिल्या पाहिजेत, जो राज्याचं हित पाहील, जो राज्य योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल आणि जो या राज्याचा स्वाभिमान टिकवेल अशी कोणी व्यक्ती असेल तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.
सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या आरोपांवर काय म्हणाले?
सिद्धिविनायक मंदिर आम्ही ज्या पद्धतीने सांभाळलं आणि त्याचा जो, त्याच्या निधीचा जो सामाजिक कार्यासाठी विनियोग केला तो यापूर्वी कधीच झाला नव्हता, असे राऊत म्हणाले. त्यांनी एका कार्यकर्त्याचे उदाहरण दिले की, आदेश बांदेकर अध्यक्ष असताना त्यांनी डायलिसिस केंद्रासाठी मशीन घेण्यासाठी एक रक्कम मंजूर केली. त्यानंतर सत्ता बदलल्यावर जेव्हा ते कार्यकर्ते नव्या अध्यक्षांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी तो डायलिसिस केंद्राचा निधी रद्द केला आणि म्हटलं ‘जर तू आमच्या पक्षात प्रवेश केलास तरच तुला हा निधी मंजूर केला जाईल. आदेश बांदेकर, संजय सावंत हे सगळे लोक असताना जेवढं उत्तम काम केलं तेवढं कधीच ते काम होऊ शकलं नाही, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ