Devendra Fadnavis: गेल्या अनेक दिवसांपासून इचलकरंजीचा पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. त्यामुळे इचलकरंजीला पाणी कुठून देणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (20 जून) इचलकरंजीमधून मोठी घोषणा केली आहे. शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथून पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या योजनेसाठी लागणारा सर्व पैसा हा राज्य सरकारकडून दिला जाईल, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासंदर्भात आमदार आणि खासदारांनी आपल्याला सादरीकरण केलं होतं असं फडणवीस यांनी सांगितलं. इचलकरंजीमध्ये जवाहर साखर कारखान्याचे नामविस्तार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना असे करण्यात आलं. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख उपस्थित हो. याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख मंत्री उपस्थित होते.
कोणाचेही पाणी पळवले जाणार नाही
ते म्हणाले की, या संदर्भात कोणताही वाद होणार नाही, कोणाचेही पाणी पळवले जाणार नाही, कोणीही मध्ये येणार नाही अशा पद्धतीने नवीन योजना त्यांनी शोधून काढली आहे. त्यानुसार शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथून योजना अंमलात आणणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून इचलकरंजी शहरासाठी 2051 सालापर्यंत इचलकरंजीला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी शिरोळ तालुक्यातील दानवाडमधून घेण्यात येईल अशीही त्यांनी घोषणा केली. हा सर्व निधी राज्य सरकार देईल असेही ते म्हणाले.
पॉवरलूमसाठी स्वस्तामध्ये वीज देण्यासंदर्भात घोषणा
दरम्यान, इचलकरंजी पॉवरलूमसाठी सुद्धा स्वस्तामध्ये वीज देण्यासंदर्भात फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, सोलरच्या माध्यमातून वीज देण्याचा मनोदय असून पंतप्रधान मोदी यांनी सोलरसंदर्भात खूप मोठं काम केलं आहे. जवळपास सव्वातीनशे मेगावॅट वीज इचलकरंजीत लागते. म्हणून या संदर्भात सोलर पार्क उभा करून इचलकरंजी पॉवरलूमसाठी आम्ही वीज देणार आहोत. ही वीज स्वच्छ असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. यामुळे विजेचे भाव वाढणार नाहीत आणि पॉवरलूमसमोर जो विजेचा प्रश्न येतो, तो सोडवता येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे