साप्ताहिक अंकशास्त्र, 25 May To 31 May:रवि योग, व्यतिपातसह सर्वार्थ सिद्धि योगाचा प्रभाव! मूलांक 1, 3, 8 नोकरी-करिअरमध्ये प्रगती! धनवृद्धीचे योग! अंकशास्त्रानुसार जाणून घ्या, तुमचे राशीभविष्य


Weekly Numerology Prediction 25 May To 31 May: 25 ते 31 मे या आठवड्यात रवि योग, गंगा दशहरा, एकादशी, व्यतिपात योग, त्रयोदशी, प्रदोष व्रत, पौर्णिमा सर्वार्थ सिद्धि योगासह राहु गोचर होत आहे. दरम्यान मूलांक 1, 3 सह या मूलांकासाठी नोकरी- व्यवसायात प्रगतीचे योग, मूलांक 2, 7 सह या मूलांकांची आर्थिक स्थिती उत्तम असेल. प्रेमसंबंधांमध्ये मूलांक 1, 2 सह या मूलांकासाठी नाते अधिक दृढ होण्याचे योग आहेत. दरम्यान मूलांक 3, 7 सह या मूलांकांनी सावध राहण्याची गरज आहे. तुमचा मूलांक काय सांगतो याबद्दल ज्योतिष, आध्यात्मिक गुरू, न्युमरोलॉजिस्ट नंदिता पांडे यांच्याकडून, मे मधील हा आठवडा मूलांक 1 ते मूलांक 9 साठी कसा असेल ते पाहूया.

Weelkly Numerology 25 To 31 May
Weekly Numerology 25 May To 31 May:रवि योग, गंगा दशहरा, एकादशी, व्यतिपात योग, त्रयोदशी, प्रदोष व्रत, पौर्णिमा सर्वार्थ सिद्धि योगासह राहु गोचरचा प्रभाव सर्व मूलांकावर असेल. या आठवड्यात मूलांक 1 साठी नोकरीत प्रगती, मूलांक 4 संवादामुळे कामातील अडचणी कमी होतील, मूलांक 6 आर्थिक प्रोजेक्ट्स यशस्वी, मूलांक 9 आर्थिक स्थितीत सुधारणा असेल. तुमचा मूलांक या आठवड्याबाबत काय सांगतो, जाणून घेऊया थेट ज्योतिषी, आध्यात्मिक गुरू,न्युमरोलॉजिस्ट नंदिता पांडे यांच्याकडून, चला तर पाहूया मूलांक 1 ते 09 साठी हा आठवडा कसा असेल?

मूलांक 1 – नोकरीत प्रगती, धनवृद्धीचे योग

मूलांक 1 - नोकरीत प्रगती, धनवृद्धीचे योग

मे महिन्याच्या या आठवड्यात नोकरीत प्रगती असून भविष्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेवू शकता. भूतकाळातील अनुभवांमधून शिकून भविष्यासाठी नियोजन करण्यावर भर देणार आहात. आर्थिक बाबतीत प्रगती असून धनवृद्धीचे शुभ योग आहेत. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम अधिक दृढ होईल तसेच जोडीदार तुमच्याकडे जास्त लक्ष देणार आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांत अडकण्याची शक्यता तेव्हा सरकारी कामे आधी पूर्ण करा. दरम्यान काही काम पूर्ण होताना जास्त वेळ द्यावा लागेल.

मूलांक 2 – आर्थिक स्थिती मजबूत होणार

मूलांक 2 - आर्थिक स्थिती मजबूत होणार

मे महिन्याच्या या आठवड्यात आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार आहे. धनलाभाचे योग आहेत तेव्हा गुंतवणुकिचा विचार नक्की करा. प्रेमसंबंधात प्रेम वाढेल आणि नाते अधिक मधुर होईल. घरात वातावरण सुखी समाधानी असेल. नोकरीत स्वतःच्या विचारांवर ठाम राहून घेतलेले निर्णय योग्य ठरतील तसचे प्रोजेक्ट्स यशाच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. आठवड्याच्या शेवटी भावनिकदृष्ट्या वेळ चांगली असून ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी वाढेल.

मूलांक 3 – करिअरमध्ये यश, समाधानात वाढ

मूलांक 3 - करिअरमध्ये यश, समाधानात वाढ

मे महिन्याच्या या आठवड्यात नोकरीत चांगले यश असून प्रोजेक्ट्स प्रगतीच्या मार्गाने पुढे जाणार आहेत. करिअरमध्ये कामांवर आणि प्रोजेक्ट्सवर नियंत्रण ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल. प्रेमसंबंधात मात्र अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण तुम्ही जोडीदाराला वेळ दिला नाही तर नाराजीचे सुर वाढतील. एकमेकांना वेळ दिलात तर नाते अधिक दृढ होईल आणि समाधान वाढेल. आर्थिक बाबतीत खर्च आहे पण गुंतवणुकीकडे विशेष लक्ष देणार आहेत. आठवड्याच्या शेवटी एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा.

मूलांक 4 – संवादाने समस्या सोडवा

मूलांक 4 - संवादाने समस्या सोडवा

मे महिन्याच्या या आठवड्यात संयम राखून पुढे जाणे फायदेशीर ठरेल. नोकरीत गेल्या काही दिवसांपासून अडचणी सुरू आहेत त्या संवादातून आणि चर्चेद्वारे सोडविल्या तर कमी होतील. तुम्हाला जसे हवेत तसे सकारात्मक परिणाम दिसतील. आर्थिक बाबतीत अहंकारामुळे वाद होईल असे दिसते आहे तेव्हा अहंकाराला बाजूला ठेवा. प्रेमसंबंधातही संयम आणि चांगल्या वागणुकिमुळे नाते अधिक मधुर होणार आहे. आठवड्याच्या शेवटी थोडी अस्वस्थता असेल पण काळानुसार सगळं काही ठिक होईल.

मूलांक 5 – भागिदारातील कामात यश

मूलांक 5 - भागिदारातील कामात यश

मे महिन्याच्या या आठवड्यात भागीदारीत केलेली कामे यशाचे नवे मार्ग खुले करणार आहेत. करिअरमध्ये प्रगती झाल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. मात्र आर्थिक बाबतीत टेन्शन वाढू शकते. एखाद्या गुंतवणुकीबाबत जास्त तणाव जाणवेल. प्रेमसंबंधात सगळं काही ठिक असेल पण एखादी बातमी मन दुखावू शकते. आठवड्याच्या शेवटी संयम आणि समतोल राखून वागा म्हणजे सुख आणि समृद्धी लाभेल.

मूलांक 6 – आर्थिक प्रोजेक्ट्स यशस्वी

मूलांक 6 - आर्थिक प्रोजेक्ट्स यशस्वी

मे महिन्याच्या या आठवड्यात नोकरीत प्रगती असून जीवनात सुख-समृद्धीचे योग आहेत. एखाद्या तरुण व्यक्तीच्या सल्ल्यामुळे आर्थिक प्रोजेक्ट्स यशस्वी होऊ शकतात. आर्थिक बाबतीत प्रगती आणि धनवृद्धीचे शुभ योग आहेत. प्रेमसंबंधात संवादातून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला तर नाराजी लवकर कमी होईल. मात्र आठवड्याच्या शेवटी भावनिक कारणांमुळे मन अस्वस्थ राहू शकते.

मूलांक 7 – गुंतवणुकी संदर्भात सल्ला महत्त्वाचा

मूलांक 7 - गुंतवणुकी संदर्भात सल्ला महत्त्वाचा

मे महिन्याच्या या आठवड्यात आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार आहे. धनलाभाचे प्रबळ योग तयार होत आहेत. गुंतवणुकीसंदर्भात त्वरित निर्णय घेतल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. तज्ज्ञांचा सल्ला अधिक लाभदायक ठरेल. प्रेमसंबंधात नाते अधिक मधुर होणार असून तुम्ही घरात याबद्दल सांगू शकता. नोकरी असो वा व्यवसाय रागावर नियंत्रण ठेवा. सगळ्यांचे ऐका पण निर्णय स्वतःच्या मनाप्रमाणे घ्या, आठवड्याच्या शेवटी कोणत्याही कागदपत्रांवर किंवा करारांवर स्वाक्षरी करताना काळजी घ्या, अन्यथा भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

मूलांक 8 – नोकरी- व्यवसायात प्रगती

मूलांक 8 - नोकरी- व्यवसायात प्रगती

मे महिन्याच्या या आठवड्यात नोकरी असो वा व्यवसाय उत्तम प्रगतीचे योग आहेत. प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी सगळेजण तुम्हाला मदत करतील. आर्थिक बाबतीत स्थिती ठिक आहे पण त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे काम हाती घेणार त्याचा सखोल अभ्यास करा. रणनीती आखून योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केलं तर प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. घरात सुखी समाधानी वातावरण असेल. सकारात्मक विचाराने यशाच्या मार्गावर वाटचाल करणार आहात.

मूलांक 9 – आर्थिक स्थितीत उत्तम सुधारणा

मूलांक 9 - आर्थिक स्थितीत उत्तम सुधारणा

मे महिन्याच्या या आठवड्यात आर्थिक बाबतीत अनेक सकारात्मक बदल होणार आहेत. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक असेल. नोकरीत तुम्ही कठोर मेहनत करता. दिवस रात्र काम करता याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. भावनिक कारणांमुळे मन अस्वस्थ राहू शकते पण वेळेनुसार सगळे काही ठिक होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न शुभ परिणाम घेऊन येतील. तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतात ती मिळेल त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा