CJP Protest Delhi LIVE: ही लोकशाही आहे का? पोलीस ठाण्यातून सुटका होताच प्रियंका गांधींचा हल्लाबोल! – Marathi News | CJP Protest jantar mantar LIVE Updates in Marathi 21 july 2026 Abhijeet Dipke Sonam Wangchuk Latest News in Marathi


  • 21 Jul 2026 09:47 PM (IST)

    ही लोकशाही आहे का? पोलीस ठाण्यातून सुटका होताच प्रियंका गांधींचा हल्लाबोल!

    पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले होते. सुटका होताच प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकव्यात. सरकारने पेपर लीक रोखण्यासाठी एखादे विधेयक आणावे. दोषी असणाऱ्यांना सोडून विद्यार्थ्यांना मारले जात आहे. मुली, मुलं रुग्णालयात आहेत. ही लोकशाही आहे का. आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. संसद ही युवकांची आहे, असा राग प्रियंका गांधई यांनी व्यक्त केला.

  • 21 Jul 2026 09:41 PM (IST)

    राहुल गांधी यांची पोलिसांकडून सुटका, छत्रसाल पोलिसांच्या होते ताब्यात!

    काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. ते गेल्या साडे तीन तासांपाूसन छत्रसाल पोलीस ठाण्यात होते. त्यांची आता सुटका करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचीदेखील सुटका करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.

  • 21 Jul 2026 09:40 PM (IST)

    राहुल गांधी यांची साडे तीन तासांनंतर सुटका

    साडे तीन तासांनंतर छत्रसाल पोलिसांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सुटका केली आहे.

  • 21 Jul 2026 08:57 PM (IST)

    सोनिया गांधी पोलीस ठाण्यात हजर, राहुल गांधी यांना भेटण्यास आई दाखल….

    सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात लेकाला भेटायला हजर, राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ज्येष्ठ नेत्या पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत.

  • 21 Jul 2026 07:49 PM (IST)

    राहुल गांधी यांना मॉडेल टाऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं

    राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसचे ठिय्या आंदोलन सुरू असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांना मॉडेल टाऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनी घेतली आहे.

  • 21 Jul 2026 06:50 PM (IST)

    मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी दिल्ली पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी काही खासदारांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • 21 Jul 2026 06:34 PM (IST)

    ठिय्या आंदोलन मोडीत काढण्यासाठी दिल्ली पोलीस आक्रमक, आंदोलक खासदार ताब्यात!

    काँग्रेसच्या खासदारांचे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू आहे. परंतु हे आंदोलन आता मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. दिल्ली पोलिसांकडून आंदोलक खासदारांना ताब्यात घेतलं जातंय. तरीदेखील आंदोलक खासदार आंदोलकांवर ठाम आहेत.

  • 21 Jul 2026 06:30 PM (IST)

    दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये, ठिय्या आंदोलन करणारे खासदार पोलिसांच्या ताब्यात

    गेल्या तीन तासांपासून काँग्रेसचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व खासदार राहुल गांधी करत आहेत. याच आंदोलनातील काही खासदार, महिला खासदार यांना पोलीस घेऊन जात आहेत.

  • 21 Jul 2026 06:20 PM (IST)

    राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनात सुप्रिया सुळे सहभागी, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात गेल्या तीन तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आता खासदार सुप्रिया सुळे यादेखील सहभागी झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

  • 21 Jul 2026 06:14 PM (IST)

    मुंबईतील मोर्चा आता शिवसेना भवनाजवळ, प्रधान यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

    मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवरही मोठे आंदोलन सुरू झाले आहे. या मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले आहेत. आता हा मोर्चा शिवसेना भवन परिसरात पोहोचला आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हा मोर्चा काढण्यात आला आहे.

  • 21 Jul 2026 06:01 PM (IST)

    राहुल गांधी यांच्या मागण्या काय?

    राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये त्यांनी पाच मागण्या केल्या आहेत.  या पाच मागण्या खालीलप्रमाणे आहेत. या मागण्यांचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    विद्यार्थ्यांवर झालेल्या लाटीचार्जवर गृहमंत्री अमित शाहांनी संसदेत निवेदन द्यावे.

    विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हावी

    धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या

    संसदेतील चर्चेवेळी गृहसचिवांनी उपस्थित राहावे.

    आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी व्हावी

  • 21 Jul 2026 05:17 PM (IST)

    राहुल गांधींच्या भेटीनंतर आता जितेंद्र सिंह अमित शाहांच्या भेटीला निघाले आहेत.

    राहुल गांधींच्या भेटीनंतर आता जितेंद्र सिंह अमित शाहांच्या भेटीला निघाले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या काही मागण्या जितेंद्र सिंह यांना सांगितल्या आहेत.  याच मागण्या घेऊन आता जितेंद्र सिंह हे अमित शाहांच्या भेटीला निघाले आहेत.

  • 21 Jul 2026 03:46 PM (IST)

    शरद पवार जंतर मंतरवर पोहोचले, अभिजीत दीपकेंची घेतली भेट

    जंमत-मंतर येथे सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर ठिय्या मांडला आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार हे जंतर-मंतरवर पोहोचले आहेत. त्यांनी अभिजीत दीपकेंची भेट घेतली आहे.

  • 21 Jul 2026 03:45 PM (IST)

    लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला

    लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचा कसून ताबा मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव मागे घेणार नसल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे.

  • 21 Jul 2026 03:43 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी आणि इतर काही नेते असल्याचे दिसत आहे.

  • 21 Jul 2026 03:25 PM (IST)

    मल्लिकार्जुन खर्गेंनी विद्यार्थांचा मुद्दा मांडताच सत्ताधाऱ्यांचा गदारोळ

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विद्यार्थांचा मुद्दा मांडताच सत्ताधाऱ्यांचा गदारोळ पाहायला मिळाला. त्यानंतर सभापतींकडून राज्यसभा स्थगित करण्यात आली. लोकसभा, राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित राहणार आहे.

  • 21 Jul 2026 03:08 PM (IST)

    देशाच्या राजकारणातला कालचा दिवस हा सर्वात काळा होता- अमित ठाकरे

    महाराष्ट्रामध्ये जिकडे कारवाई होत असेल तिकडे आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत. जी नोटीस पाठवतात 0 FIR आहे. आम्ही दिल्लीला गेलेलो होतो तेव्हा कळलं 5 6 लोक सिव्हिलमध्ये आले, पांढऱ्या कपड्यात गुंडाळून घेऊन गेले. लोकशाही दिसली त्यात. तुम्हाला चर्चा करायची इच्छा नाही झाली. मी अभिजित ला भेटलो त्याच्याकडून माहिती घेतली. आपल्या देशाच्या राजकारणातला सर्वात काळा दिवस कालचा होता असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • 21 Jul 2026 02:54 PM (IST)

    सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? अमित ठाकरे

    दिल्लीत CJP चं आंदोलनात सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबाबत आता अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? पेपरफुटीनंतर 20 विद्यार्थ्यांची आत्महत्या केल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

  • 21 Jul 2026 02:46 PM (IST)

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम. दिल्ली पोलिसांकडून धर्मेंद्र प्रधानांच्या घराच्या परिसरात बॅरिकेटिंग. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जंतरमंतरवर आंदोलन

  • 21 Jul 2026 02:36 PM (IST)

    लेकरांवर लाठीचार्ज केला ते काय दहशतवादी होते का? अभिजीतची आई

    गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत CJP चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मात्र, सोमवारी या आंदोलनातील अनेक विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांनी मारहाण केली. यावर लेकरांवर लाठीचार्ज केला ते काय दहशतवादी होते का? असा सवाल अभिजीत दिपकेच्या आईने केला आहे.

  • 21 Jul 2026 02:24 PM (IST)

    विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राजकारण- सदाभाऊ खोत

    देशात विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू आहे. त्यामाध्यमातून काही संघटना पक्ष आतंकवाद परसवत आहे.  मी पण विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केले आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी केलं की मोदी सरकार हटविण्यासाठी दिशाभूल आंदोलन. सदाभाऊ खोत यांची टीका

  • 21 Jul 2026 02:12 PM (IST)

    सरकार मानसिक रुग्ण झालंय का?, राज ठाकरेंचा सवाल

    सरकार मानसिक रुग्ण झालंय का?, आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवरुन राज ठाकरेंचा संताप. सरकारलाच रुग्णालयात भरती करण्याची गरज- राज ठाकरे

  • 21 Jul 2026 02:05 PM (IST)

    लोकसभेत गदारोळ तर राज्यसभा उद्यापर्यंत स्थगित

    राज्यसभेचं कामकाज उद्या पर्यंत स्थगीत करण्यात आले असून सध्या CJP च्या दिल्लीतील आंदोलनावरून लोकसभेत मोठा गदारोळ सुरु आहे.

  • 21 Jul 2026 02:00 PM (IST)

    आंदोलनकर्त्यांना आतंकवादी म्हणणे योग्य नाही-शंभुराज देसाई

    लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण आंदोलनकर्त्यांना आतंकवादी म्हणणे योग्य नाही असे मंत्री शुंभराज देसाई म्हणाले. त्यांनी सदाभाऊ खोत यांचे मत खोडून काढले. खोतांनी दिल्लीतील आंदोलकांचा दहशतवादी असा उल्लेख केला होता.

  • 21 Jul 2026 01:50 PM (IST)

    सोनम वांगचुक यांच्या पाठिंबासाठी आंदोलन

    सोनम वांगचुक यांच्या पाठिंबासाठी जळगाव जिल्हा मायनॉरिटी एज्युकेशन फेडरेशनतर्फे आंदोलन करण्यात आले. दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्यांना बेदम मारहाण करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, करण्यात आले या घटनेचा देखील मायनॉरिटी एज्युकेशन फेडरेशन तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.

  • 21 Jul 2026 01:40 PM (IST)

    जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

    जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन देण्यात आले.केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा तात्काळ लागू करावा, प्रार्थनास्थळे कायदा १९९१ ची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. धरणे आंदोलन करण्यात मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी या निवेदन देण्यात आले. आंदोलनामध्ये भारत मुक्ती मोर्चा च्या तसेच राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले.

  • 21 Jul 2026 01:30 PM (IST)

    सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत जालन्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली

    दिल्लीमधील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरले आहेत याच पार्श्वभूमीवर आज जालना शहरात एका इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेतील लहान लहान चिमुकल्यांनी देखील सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत रॅली काढली,वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स हातात घेत हे चिमुकले सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.

  • 21 Jul 2026 01:20 PM (IST)

    विद्यार्थी देशद्रोही आहेत का? मनसे आक्रमक

    “विद्यार्थी देशद्रोही आहेत का?” जंतर-मंतर लाठीचार्जवरून कल्याणमध्ये मनसेचा संताप दिसून आला. धर्मेंद्र प्रधानांच्या फोटोला काळे फासून पायदळी तुडवत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आक्रमक झाली.

  • 21 Jul 2026 01:10 PM (IST)

    हिंगोलीत शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

    हिंगोलीत शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सर्व विद्यार्थी व पदवीधर कृती समितीचा विद्यार्थी जागर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. एमपीएससीच्या सर्व परिक्षा ऑफ लाईन पद्धतीने घ्या,पेपर फुटी बंद करा ह्या सह विवीध मागण्यांसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

  • 21 Jul 2026 01:00 PM (IST)

    मंत्री शिरसाट यांची संजय राऊतांवर खोचक टीका

    संजय राऊत यांना माणसं मेलेली पाहायचे आहेत का? अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. दिल्लीत जे घडतंय त्यात काही लोकांनी अतिरेकही करू नये. सरकारनेही त्यांना आपले विद्यार्थी आहेत म्हणून ट्रीट केले पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांना आपलं म्हणून वागणूक द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

  • 21 Jul 2026 12:49 PM (IST)

    राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जखमी आंदोलकांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल

    जे.पी. नड्डा यांनी जखमी आंदोलकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. तर यासोबतच आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही जखमी आंदोलकांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे.

  • 21 Jul 2026 12:37 PM (IST)

    संजय राऊत अभिजीत दिपके यांच्या भेटीला

    ठाकरे सेनेचे संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई दिल्लीत जंतर मंतरवर पोहोचले आहेत.  आता या सर्व नेत्यांनी अभिजीत दिपके आणि आंदोलकांच्या भेट घेण्यासाठी पोहोचले आहे. कालच्या हल्ल्यात जे आंदोलक जखमी झाले त्यांची विचारपूस करण्यासाठी नेते आता दिल्लीत पोहोचले आहे.

  • 21 Jul 2026 12:30 PM (IST)

    आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जमुळे राहुल गांधीचा यांचा सरकारवर हल्लाबोल

    राहुल गांधी यांची दिल्लीतील आंदोलनावर प्रतिक्रिया,” विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत आणि त्याचसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना मारले जात आहे. हे पूर्णपणे भारतीय नागरिकत्वाच्या विरोधात आहे. जे काल घडलं त्यासाठी मोदींनी माफीही मागितला नाही. हे जे तरुण आहे ते चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी आंदोलन करत आहे. मग पंतप्रधान शांत का आहे. त्यांनी यावर उत्तर द्यावं आणि हे सगळ थांबवाव, पोलिसांनी आंदोलकांना मारलं ते अतिशय चूकीचे आहे.”

  • 21 Jul 2026 12:23 PM (IST)

    चेंबूरमध्ये CJP च्या समर्थनार्थ रहिवाशाचं आंदोलन

    चेंबूरमध्ये CJP च्या समर्थनार्थ रहिवाशाचं आंदोलन. केंद्र सरकारच्या हुकुमशाहीविरोधात हे मोर्चा सुरु केला आहे. रहिवाशी रस्त्यावर उतरले असून ते आता आक्रमक झालेले दिसत आहे.

  • 21 Jul 2026 12:20 PM (IST)

    सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना आंतकवादी म्हटले यावर आता बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

    सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना आंतकवादी म्हटले आहे यावर आता बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, “हे विधान फारचं चुकीचे आहे. भारतातील लोकांना अतिरेकी किंवा आंतकवादी ठरवणं अतिशय चुकीचे आहे, आपल्याच देशातील लोकांना, तरुणांना आपण अतिरेकी ठरवताय तर त्याचे परिणाम काही देशभरात चांगले पडणार नाही, याचे अतिशय वाईट परिणाम देशभरात पडतील. सदाभाऊ खोत यांनी केलेले विधान त्यांनी मागे घ्यावे. माझं असे मत आहे की आंदोलन मुद्यावर होणं महत्त्वाचं आहे. राजीनामापेक्षा या सगळ्या परिक्षा होतात त्याच्या मजबुतीसाठी केले पाहिजे. या सगळ्या समिती असतील त्याला न्यायालयीन दर्जा कसा देता येईल किंवा त्याच्यामध्ये कुठे भ्रष्टाचारच होणार नाही याची मागणी केली पाहिजे.”

  • 21 Jul 2026 12:10 PM (IST)

    लाठीमारवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

    सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीमार करायला आवडत नाही, पण आपण बघितल ज्याप्रकारची अवस्था त्याठिकाणी होती. जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनर्थ घडला असला. पोलिसांनी मोठा संयम दाखवला आहे. अशाप्रकारचं आंदोलन हे योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी जेवढी कारवाई करायला हवी तेवढी पोलिसांनी केली आहे.

  • 21 Jul 2026 12:02 PM (IST)

    लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार – देवेंद्र फडणवीस

    लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. दिल्लीतील आंदोलनात राजकीय पक्ष पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी नियंत्रण आणलं नसतं, तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या… जितरी कारवाई केली पाहिजे, तितकी कारवाई पोलिसांनी केली… असं वक्तव्य देखील पोलिसांना केलं आहे.

  • 21 Jul 2026 12:00 PM (IST)

    लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच- देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

    लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबतच संविधानाने टाकलेली जबाबदारी यो दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्वक आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला  परवानगीही दिली जाईल आणि अशी आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे.

  • 21 Jul 2026 11:50 AM (IST)

    अशा आंतकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या – सदाभाऊ खोत

    शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेऊ नका, अशा आंतकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या. इंडिया आघाडी आतंकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करतेय… असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.

  • 21 Jul 2026 11:42 AM (IST)

    केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात चेंबूरच्या सिद्धार्थ नगरमध्ये आज आंदोलन

    केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात चेंबूरच्या सिद्धार्थ नगरमध्ये आज आंदोलन पुकारण्यात आलं आहे. दिल्लीतील आंदोलनाला समर्थन चेंबूरच्या सिद्धार्थ नगरमध्ये आज रहिवाशांचे आंदोलन होणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सिद्धार्थ नगरचे रहिवासी आज रस्त्यावर उतरणार आहेत.

  • 21 Jul 2026 11:41 AM (IST)

    लाठीचार्चा का झाला? सरकारनं चर्चा करावी – मल्लिकार्जुन खर्गे

    लाठीचार्चा का करण्यात आला? विद्यर्थ्यांना का मारलं? यावर सरकारनं चर्चा करावी… कालच्या आंदोलन प्रकरणी काय चर्चा झाली, समोर आलं पाहिजे… असं वक्तव्य देखील मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे.

  • 21 Jul 2026 11:35 AM (IST)

    ही लढाई आम्ही मिळून लढणार – केजरीवाल

    दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे. त्यांनी ‘एक्स’ (X) वर लिहिलं, “काल मुलांवर जी क्रूरता करण्यात आली, ती अत्यंत लज्जास्पद आहे. कोणत्याही मुलाला कायदेशीर किंवा वैद्यकीय मदतीची गरज असल्यास, कृपया 8588833548 या हेल्पलाइन क्रमांकावर संदेश पाठवा. आम्ही तुम्हाला सर्वोत्तम कायदेशीर टीम उपलब्ध करून देऊ.” असं ट्विट करण्यात आलं आहे.

  • 21 Jul 2026 11:35 AM (IST)

    आम्ही सर्वजण आतमध्ये घाबरलेलो; जमाव हल्ला करेल अशी भीती वाटत होती – कंगना राणौत

    ‘कॉकरोच पार्टी’ने केलेल्या निदर्शनांवर कंगना राणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, संसद भवनातील प्रत्येकालाच जमाव हल्ला करेल याची भीती वाटत होती, परंतु दिल्ली पोलीस एका ढालीप्रमाणे ठामपणे उभे राहिले.

  • 21 Jul 2026 11:30 AM (IST)

    ‘देशाचं मीठ खाल्ल आहे, त्यामुळे थोडं तरी निभवा…’, प्रसिद्ध गायकाचा संताप

    संताप व्यक्त करत बॉलिवूडचा प्रसिद्ध  गायक विशाल ददलानी म्हणाला, ‘मुलांवर हात उचलला आहे त्यांनी… मुलं जी फक्त त्यांच्या हक्कासाठी उभी होती… आपल्या भविष्यासाठी, देशाच्या भविष्यासाठी, सर्वांच्या भविष्यासाठी उभी होती… त्यांना मारण्यात आलं, कुत्र्यांसारखं मारलं… काठ्यांनी मारलं, टिएर गॅसने… काय बोलायचं? जे लोकं आता शांत आहेत, तुम्ही जगत कसे आहात? किती सलाम ठोकणार, किड्यांसारखं जगताय, थोडीतरी लाज बाळगा.. या देशाचं मीठ खाल्लं आहे. थोडं तर निभवा… थोडं तरी…’. असं देखील विशाल ददलानी म्हणाला आहे.

  • 21 Jul 2026 11:24 AM (IST)

    लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला! – अमित राज ठाकरे

    २० हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात शांततेत प्रश्न विचारणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठ्या चालवल्यात? बंदुका दाखवून त्यांना अडवलंत? १५-१५ वर्षांच्या मुलांची डोकी फोडली? अश्रूधूर सोडला? सत्तेची ही कसली मस्ती आलीये सरकारला? देशात लोकशाही उरलीये की निव्वळ दडपशाही सुरू आहे? विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं हा गुन्हा आहे का? त्यासाठी शांतपणे रस्त्यावर उतरलेल्या महिला आंदोलकांवर काल पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी लाठ्या चालवल्या. नाव आणि बॅज नंबर नसलेले जवान आणून तरुणांना अगदी तुडवलं गेलं. सोनम वांगचुक सरांच्या पत्नीशी गैरवर्तन केलं गेलं आणि अनेक तरुणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं. देशात शांतपणे न्याय मागणाऱ्यांची ही अवस्था? ही कसली गुंडगिरी सुरू आहे??? असा संताप अमित राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

  • 21 Jul 2026 10:57 AM (IST)

    नीट पेपरफुटीतील आरोपींना कठोर शिक्षा होणार; दिल्लीत आंदोलन पेटलं असताना PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

    नीट पेपरफुटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.नीट पेपरफुटीतील आरोपींना कठोर शिक्षा होणार. विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ देणार नाही, असे मोदी म्हणाले.

  • 21 Jul 2026 10:55 AM (IST)

    शंभू बॉर्डरवर हजारो शेतकरी दाखल, दिल्लीत आज 2 आंदोलन

    शंभू बॉर्डरवर हजारो शेतकरी दाखल झाल आहेत. तर दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक जंतर-मंतरवर आहेत. त्यामुळे आज दिल्लीत दुहेरी आंदोलन पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क आहेत.

  • 21 Jul 2026 10:41 AM (IST)

    पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार : किरण रिजिजू

    केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचं हित सर्वप्रथम ठेऊन निर्णय घेणार आहे. पेपरफुटी प्रकरणी 13 जणांना अटक केली आहे. पेपरफुटीर प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार’.

  • 21 Jul 2026 10:33 AM (IST)

    एनडीए संसदीय दलाची ‘मंगल मिलन’ बैठक

    नवी दिल्ली येथील संसद वाचनालय इमारतीतील जी. एम. सी. बालयोगी सभागृहात एनडीए संसदीय दलाची ‘मंगल मिलन’ बैठक सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएचे सर्व प्रमुख नेते आणि खासदार उपस्थित असल्याचे सांगण्यात आलं आहे. या बैठकीत काय चर्चा होतेय, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • 21 Jul 2026 10:13 AM (IST)

    अभिजीत दीपके यांच्याकडून पोलिसांवर गंभीर आरोप

    अभिजीत दीपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. यावेळी पोलिसांनी विद्यार्थिनींवर लाठीचार्ज केल्याचा आरोप दीपके यांनी केला आहे. दीपके यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

  • 21 Jul 2026 09:56 AM (IST)

    पोलिसांना झापणाऱ्या महिलेचे राऊतांनी केले काैतुक

    पोलिसांना झापणाऱ्या महिलेचे राऊतांनी नुकताच काैतुक केले. काल अभिजीत दिपके यांचा मोर्चा संसदेकडे निघाल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण बघायला मिळाले.

  • 21 Jul 2026 09:44 AM (IST)

    पहिला एल्गार राहुल गांधी यांनी पुकारला- संजय राऊत

    नीट विरोधात पहिला एल्गार राहुल गांधी यांनी पुकारला. पवारांची एनसीपी आंदोलनाच्या बाजूने आहे, त्यांनी कालच्या बैठकीत ते स्पष्ट केल्याचे दावा संजय राऊत यांनी केला.

  • 21 Jul 2026 09:39 AM (IST)

    विरोधी पक्षांनी हे आंदोलन ताब्यात घ्यायला पाहिजे- संजय राऊत

    जंतर मंतरवरील आंदोलनावर संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले. संजय राऊत राऊत यांनी नुकताच म्हटले की, जंतर मंतरवरील आंदोलन विरोधी पक्षांनी ताब्यात घ्यायला हवे. संजय राऊत हे दुपारनंतर जंतर मंतरवर जाणार आहेत.

  • 21 Jul 2026 09:30 AM (IST)

    राजस्थानातील ड्रग्ज सप्लायर बिष्णोई टोळीतील दोघांना नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीशी या टोळीचा संबंध नाही पोलिसांनी केला खुलासा. ‘नशामुक्त नाशिक’ अभियानांतर्गत शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. जयपूर ते साक्री असा सुमारे ८७० किमी पाठलाग करून आरोपींना अटक८२ किलो २४६ ग्रॅम डोडा (पॉपी स्ट्रॉ) जप्त

  • 21 Jul 2026 09:29 AM (IST)

    तुम्हाला मुलं नाहा का? अभिजीत दिपकेचा सवाल

    दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे उपोषण सुरू आहे. यादरम्यान आंदोलनकरते आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झाली. यादरम्यान अभिजीत दिपके याने पोलिसांना सवाल केला की , तुम्हाला मुलं नाहीत का?

  • 21 Jul 2026 09:16 AM (IST)

    सत्तेचा माज जो झाला आहे त्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर- संदीप देशपांडे

    जालियनवाला बाग मध्ये ब्रिटिश जनरल डायर होता. त्याने गोळीबार केला तास त्याने कल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणारे कायर होते. ही आपलेच विद्यार्थी मग तुम्ही संवाद साधू शकत नाही का हे सरकार ब्रिटिशांनपेक्षा वाईट. सत्तेचा माज जो झाला आहे त्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर. आम्ही त्यांना सलाम करतो निश्चिपने त्यांचे अभिनंदन करणारे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

  • 21 Jul 2026 09:15 AM (IST)

    गणपत भिसे यांच्या घरासमोर असलेल्या कारची अज्ञातांकडून तोडफोड..

    अनुसूचित जाती उपवर्गीकरण समितीत सक्रिय सहभाग असणाऱ्या गणपत भिसे यांच्या घरासमोर असलेल्या कारची अज्ञातांकडून तोडफोड..परभणी शहरातील रामनगर परिसरातील घटना..गाडीची तोडफोड करतांनाची घटना cctv मध्ये कैद.. घटनेनंतर अज्ञात दोन व्यक्ती विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..गणपत भिसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचही तक्रारीत नमूद..

  • 21 Jul 2026 09:10 AM (IST)

    NDA खासदारांना नरेंद्र मोदी करणार मार्गदर्शन करणार

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी NDA खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. दिल्लीमध्ये मोठे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही बैठक आहे. आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का? यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

  • 21 Jul 2026 09:05 AM (IST)

    सरकारला सत्तेचा माज, संदीप देशपांडे यांचे मोठे विधान

    सरकारला सत्तेचा माज आला आहे. विद्यार्थ्यांना सलाम आहे. मुलींचे केस ओढले, याविरोधात सर्वांनी बोलले पाहिजे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.

  • 21 Jul 2026 08:58 AM (IST)

    अभिजीत दीपकेंसह आंदोलक आज पुन्हा जंतर मंतरवर

    अभिजीत दीपकेंसह आंदोलक आज पुन्हा जंतर मंतरवर पोहोचले आहेत. आता सरकारने चर्चा करण्यासाठी जंतर मंतरला यावं, अशी भूमिका दीपकेंनी मांडली आहे. तर आंदोलनस्थळापासून 150 मीटर आधी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

  • 21 Jul 2026 08:52 AM (IST)

    विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी चालवणारा कायर बघितला- संदिप देशपांडे

    ‘आम्ही जालियनवाला बागमध्ये गोळ्या झाडणारा जनरल डायर नाही बघितला, पण विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी चालवणारा कायर बघितला,’ असं ट्विट करत मनसेच्या संदिप देशपांडेंनी सरकारला सुनावलं आहे.

  • 21 Jul 2026 08:44 AM (IST)

    आंदोलनात पोलिसांना झापणाऱ्या महिलेचा व्हिडीओ राऊतांकडून ट्विट

    दादरमध्ये आंदोलनादरम्यान एका महिलेनं पोलिसांना झापलं. खासदार संजय राऊत यांनी व्हिडीओ ट्विट करत महिलेचं कौतुक केलं. हाच संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल, असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलंय. दादरमधील चैत्यभूमी परिसरातील आंदोलनाचा व्हिडीओ राऊतांनी ट्विट केला आहे.

  • 21 Jul 2026 08:40 AM (IST)

    आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतरवरील सुरक्षा व्यवस्था कडक

    दिल्ली: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) ‘संसद चलो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जंतर-मंतरवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

  • 21 Jul 2026 08:35 AM (IST)

    जंतर मंतरवरील आंदोलनात 118 पोलीस जखमी

    सोमवारी दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान तैनात असलेल्या दिल्ली पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलांमधील ११८ हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. यामध्ये विशेष आयुक्त, सह-आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

  • 21 Jul 2026 08:28 AM (IST)

    अँटिलिया बॉम्बस्फोट कट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात 1 ऑगस्ट रोजी आरोप निश्चिती

    अँटिलिया बॉम्बस्फोट कट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात 1 ऑगस्ट रोजी विशेष न्यायालय आरोप निश्चित करणार आहे. या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेसह 10 आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आरोप निश्चित झाल्यानंतर आरोपींनी दोष नाकारल्यास खटल्याची सुनावणी सुरू होईल. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही आढळली होती. आरोपींवर UAPA आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल असून कमाल शिक्षा फाशीची आहे.

  • 21 Jul 2026 08:27 AM (IST)

    विशेष मकोका न्यायालयाकडून अनमोल बिश्नोईविरोधात प्रोडक्शन वॉरंट जारी

    मुंबई पोलिसांना फटकारल्यानंतर विशेष मकोका न्यायालयाने अनमोल बिश्नोईविरोधात प्रोडक्शन वॉरंट जारी केलं. बाबा सिद्दीक हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोईला अटक करून त्याची कोठडीत चौकशी करता यावी यासाठी मुंबईतील विशेष मकोका न्यायालयाने त्याच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट जारी केलं आहे. भारतात उपलब्ध असूनही त्याची कोठडी मिळवण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुंबई पोलिसांना जाब विचारल्यानंतर न्यायालयाने ही कारवाई केली आहे.

    विशेष मकोका न्यायालयाने फटकारल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीक यांच्या हत्येप्रकरणी गुंड अनमोल बिश्नोईला अटक करून त्याची कोठडीत चौकशी करण्यासाठी अभियोजन पक्षाने सोमवारी त्याच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट मिळवलं आहे.

  • 21 Jul 2026 08:25 AM (IST)

    केंद्रातील मंत्र्यांनी इथं येऊन चर्चा करावी, आंदोलकांची भूमिका

    दिल्लीतल्या जंतर मंतरवर विद्यार्थी जमायला सुरुवात झाली आहे. आजदेखील संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून केंद्रातील मंत्र्यांनी इथं येऊन चर्चा करावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. कालपेक्षा अधिक विद्यार्थी आज दिल्लीत येतील, असा दावा आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी केला आहे.





  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *