AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे


गडचिरोली : सध्याचं युग हे डिजिटलचं युग आहे, मात्र येणारा काळ एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) असेल असे सांगण्यात येते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपल्या भाषणातूनही सातत्याने एआयबद्दल माहिती देत असतात. तसेच, देशातील पहिलं एआय सेंटर आपल्या महाराष्ट्रात उभारण्यात येणार असून, त्यासाठी शासनाने प्रयत्न देखील सुरू केले आहेत. आता, याच एआयच्या मदतीने गडचिरोलीतील (Gadchiroli) अंधत्व असलेल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानरुपी दृष्टी देण्याचं काम करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे निमित्त आहे. 

डोळ्यांना दिसत नसले तरी आता तंत्रज्ञानाच्या मदतीने जग ऐकता आणि ओळखता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्मार्ट व्हिजन उपकरणांची अनोखी भेट देण्यात आली. जिल्हा परिषद गडचिरोली आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या संयुक्त उपक्रमातून पहिल्या टप्प्यात 34 विद्यार्थ्यांच्या हाती ही अत्याधुनिक उपकरणे देण्यात आली आहेत. त्यामध्ये, स्मार्ट व्हिजन गॉगलचाही समावेश आहे. 

अंधत्वावर मात करत समोरील अडथळे ओळखणे, पुस्तके आणि वर्तमानपत्र वाचून दाखवणे, चलनी नोटा ओळखणे, परिचित व्यक्तींची ओळख पटवणे आणि जीपीएसच्या मदतीने मार्गदर्शन करणे अशा अनेक सुविधा या उपकरणात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा परिषदेवर कोणताही आर्थिक भार पडलेला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला, स्वावलंबनाला आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा हा उपक्रम सध्या गडचिरोलीत चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, गडचिरोलीतील हा उपक्रम यशस्वी झाल्यास राज्यभरातील इतर जिल्ह्यातही अंधत्वावर मात करत हे आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरेल. 

हेही वाचा 

अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *