Deepali Sayyed on NEET Protest: ‘या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत’, विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO


Deepali Sayyed on NEET Protest VIDEO: भारतात सध्या NEET पेपर लीकचा मुद्दा आणि या मुद्द्यावरुन देशभरात सुरु असलेलं आंदोलन चांगलंच तापलं आहे (NEET). 20 जुलै रोजी जंतर – मंतरहून थेट संसद भवनाबाहेर विद्यार्थ्यांसह (Deepali Sayyad) देशातील नागरिकांनी आंदोलन छेडलं. कॉकरोच जनता पार्टीतील समर्थकांसह, लाखोंच्या संख्येने या आंदोलनात लोक उपस्थित होते. या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं होतं. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला.  काहींची डोकी फुटली तर काहींच्या (Cockroach Janta Party) अंगावरुन रक्त वाहू लागलं होतं.  याच गोष्टीचा निषेध करत अनेक सेलिब्रिटींनी निषेध नोंदवला. बॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत, अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट करत निषेध नोंदवला. अलिकडेच मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी देखील पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं हे कोणते आंदोलन? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दिपाली सय्यद या आंदोलनावर नेमकं काय म्हणाल्या? (Deepali Sayyed reacted to the NEET protest)

अभिनेत्री दिपाली सय्यद ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्यांनी अलिकडेच देशभरात सुरु असलेल्या आंदोलनावर  भाष्य केलं आहे. त्यांनी व्हिडीओत म्हटलं की, ‘नमस्कार जय महाराष्ट्र. मी दिपाली सय्यद. नीट पेपर संदर्भात  ज्या पद्धतीने आपल्या भारताचे भविष्य असलेले विद्यार्थी आंदोलन करतायेत, नक्कीच तो त्यांचा हक्क आहे. आपण ज्या भारत देशात राहतोय, त्या देशात लोकशाही आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्य सुद्धा आहे. परंतु, व्यक्तिस्वातंत्र्यचा वापर कशापद्धतीने केला पाहिजे, याचा विशेष अधिकार आहे’, असं दिपाली आपल्या व्हिडीओत म्हणाल्या.

‘सगळ्यात आधी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर मारहाण झाली. ज्या पद्धतीने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. त्या गोष्टीचा मी मनापासून निषेध करतेय. पण आपल्याकडे असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारामुळे आपण आपल्याच सरकारी मालमत्तेचं नुकसान तर करत नाही आहोत ना?  याकडे सुद्धा आपल्या भारताच्या भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे. कदाचित विरोधक या  आंदोलनाला भडकावण्याचा प्रयत्न तर नाही ना करत?’, असा सवाल दिपाली यांनी आपल्या व्हिडीओतून उपस्थित केला. 

‘ज्या पद्धतीने बांग्लादेश आणि नेपाळमध्ये आंदोलन भडकलं होतं, तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न तर होत नाहीये ना? पण हे देखील लक्षात घ्यायला हवे की, हे जे सरकार आहे, ते सर्वसामान्यांचे सरकार आहे.  या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत, हे आपण विसरता कामा नये. शेवटी माझं एकच मत आहे. आपल्या भारताची संस्कृती ही वरिष्ठांची आदर करणारी आहे. ही मुलं आपल्या भारताचे भविष्य आहे. कृपया करुन  कुठल्याही भडकावू विधानाला ताकद देऊ नका. मला खात्री आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सरकार नक्कीच सपोर्ट करेल.  त्यांना नक्कीच पाठबळ मिळेल. जय महाराष्ट्र…’, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘धुरंधर’चा रेकॉर्ड मोडला, ‘छावा’ सिनेमालाही पछाडलं, थलपती विजयच्या ‘जना नायकन’नं ओपनिंग डेला किती कोटी कमावले?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *