Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांना उल्लेखनिय कामगिरी केली आहे. महिलांच्या 4 x 400 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक होते. सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात किरण, मचेत्तिरा पूवम्मा, प्राची आणि विथ्या रामराज यांचा समावेश होता. भारतीय संघाने ही शर्यत 3:29.69 मिनिटांत पूर्ण केली.
बहरीन संघाने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावून रौप्यपदक जिंकले
बहरीन संघाने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावून रौप्यपदक जिंकले. बहरीनच्या खेळाडूंनी 3:30.21 मिनिटांत शर्यत पूर्ण केली. भारत आणि बहरीन यांच्या वेळेत 0.52 सेकंदांचे अंतर होते. चीन संघाने तिसरे स्थान पटकावून कांस्यपदक मिळवले. चीनच्या खेळाडूंनी 3:31.02 मिनिटांत शर्यत पूर्ण केली. दरम्यान, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. यामध्ये भारतीय महिलांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. भारताला एकूण 6 सुवर्णपदक आत्तापर्यंत मिळाले आहेत.
ॲथलेटिक्समध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक
भारताने क्रिकेट, कबड्डी आणि नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आता ॲथलेटिक्समध्येही सुवर्णपदकाची भर पडली आहे. यासह भारताने पदक तालिकेत 50 चा आकडा पार केला आहे.
वित्या रामराजचे दुसरे पदक
धावपटू वित्या रामराजचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे पदक होते. यापूर्वी तिने 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. आता तिने सुवर्णपदकही पटकावले आहे. स्पर्धेदरम्यान पाऊस पडत होता, तरीही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पावसामुळे त्यांना कोणताही अडथळा आला नाही. अनेकदा पावसात धावताना खेळाडूंना अडचणी येतात.
पदक तालिकेत भारताचे 10 वे स्थान
सहाव्या सुवर्णपदकासह भारताने पदक तालिकेत 10 वे स्थान पटकावले आहे. एकूण पदकांची संख्या 51 झाली आहे. यामध्ये 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 24 कांस्य पदकांचा समावेश आहे.