Sanjay Gaikwad : मतचोरीवर बोलणारा मी एकटा सत्ताधारी पक्षाचा नेता, माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार; आमदार संजय गायकवाडांचं मोठं विधान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत म्हणाले….


Sanjay Gaikwad : नगरपरिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सगळे म्हणायचे की हे बोगस मतचोरीने निवडून येतात. भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष मतचोरी करून निवडून येतात हे, त्यावेळच्या काँग्रेसचं वक्तव्य होतं. मात्र, SIR कार्यक्रम राबवण्यापूर्वी त्यावेळी एकटा सत्ताधारी पक्षाचा मी म्हणणारा होतो की, माझ्या विधानसभा मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार आहेत. बरेच नावं डबल आणि बोगस आहेत. त्यामुळे मला त्याचा फटका बसलाय. नोवडणूक विभागाने SIR कार्यक्रम राबवण्याची आधी माझ्या मतदारसंघात 3 लाख 23 हजार मतदारांपैकी 23 हजार मतदार बोगस निघाले. SIR मुळे माझ्या एकट्या मतदारसंघातील 71 हजार मतं कमी झालेत. हे सगळे मतदार काँग्रेसच्या काळातील होते. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांचं काम बरोबर आहे. त्यांनी बोगस नावं कमी केले आहे. प्रत्येकाच्या घरात जाऊन बीएलओ पडताळणी करत आहे. त्यामुळे आता खरी मतदार यादी बनत आहे. उगाच यात राजकारण करू नये, असा महत्वपूर्ण विधान शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केलं आहे.

विशेष निवडणूक चौकशी (SIR) प्रकरणी निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या विरोधकांची मागणीसंदर्भात बोलताना संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Gaikwad on Dnyanesh Kumar)

Sanjay Gaikwad: रोहित पवारांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि IAS किंवा IPS ची परीक्षा द्यावी

ज्याप्रमाणे आमच्या पक्षातही कार्यकर्त्यांना वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजेत, त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना ही वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात. पण आता दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत. तर आमदार रोहित पवारांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, IAS किंवा IPS ची परीक्षा द्यावी. आयपीएस बनावं आणि स्वतः चौकशी करावी. त्याच्याशिवाय त्यांचं समाधान होणार नाही. असा खोचक टोलाही संजय गायकवाड यांनी यावेळी लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बांधावर गेलेत. सध्या घोषित कर्जमाफी सुलभ झालेली आहे. तर दुष्काळी परिस्थितीत कुंभमेळा घ्यावा का? असा प्रश्न विचारला असता आमदार संजय गायकवाड म्हणाले की, ज्या ठिकाणी कुंभमेळा होतो त्या ठिकाणी दुष्काळाची तीव्रता कमी आहे. कुंभमेळा ही निरंतर प्रक्रिया आहे. दुष्काळ असो अतिवृष्टी असो ती धार्मिक प्रक्रिया कधीही थांबत नाही. कुंभमेळ्यात हुल्लडपणा किंवा पैशाची उधळपट्टी नसते. त्यामुळे दुष्काळ आहे म्हणून कुंभमेळा थांबवलं पाहिजे असं काही नाही, असेही ते म्हणाले.

Sanjay Gaikwad: दुष्काळाची दाहकता फक्त शेतकऱ्यांना, दुष्काळाचा फरक अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पडत नाही

दरम्यान, दुष्काळाची दाहकता फक्त शेतकऱ्यांना आहे. दुष्काळाचा फरक अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना पडत नाही. त्यामुळे त्यांची जी तामझाम आहे ती त्याचप्रमाणे चालू राहिल. त्यामुळे त्यांना आपण हे बंद करा असं म्हणू शकत नाही. कारण त्यांच्याकडे पैसा आहे. हा मानवतेचा प्रश्न आहे. आपला अन्नदाता उपाशी असताना असे कार्यक्रम किती मोठे करायचे हे आपण ठरवावे. विकास कामे बंद करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे का? तर सध्याची विकास कामे ही कर्जाच्या भरवशावर सुरू आहेत. नक्कीच दुष्काळ आणि इतर योजनांमुळे सरकारवर नक्कीच जोर पडलेला आहे. काम थांबवल्याने सगळे ओरड करतात, कामाची कॉस्ट वाढते. विकास कामे थांबविणे हा पर्याय नसतो. जी कामे सुरू आहेत ती थांबवणे योग्य नाही. असेही आमदार संजय गायकवाड म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *