Maharashtra Rain Panjabrao Dakh News : पावसाळा सुरु होऊन चार महिन्यांचा कालावधी झाला आहे. तरीदेकील राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडला नाही. यामुळं शेतकऱ्यांची पिकं करपून गेली आहेत. मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ही परिस्थिती पाहून सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्याचं सरकारनं सांगितले आहे. दरम्यान, हवामानाची, पावसाची नेमकी काय स्थिती आहे? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख ( Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. सध्या तरी राज्यात पावसाची परिस्थिती नसल्याचे डख म्हणाले.
नेमकं काय म्हणाले पंजाबराव डख?
सध्या राज्यात पावसाची परिस्थिती नाही. पण राज्यात राज्यात पाऊस येणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. हा पाऊस काही जिल्ह्यात आणि भागातच पडणार असल्याचे डख यांनी सांगितले. राज्यात 29 आणि 30 सप्टेंबरला काही जिल्ह्यात पाऊस येणार आहे. यामध्ये नाशिक, अकोले अहिल्यानगर, पुणे, सातारा कोल्हापूर सांगली, सोलापूर पंढरपूर बारामती इंदापूर, शिरुर, कर्जत जामखेड राहता, शिर्डी राहता, कोरपगाव, श्रीरामपूर, येवला मनमाड या पट्ट्यात पाऊस होणार असल्याची माहिती डख यांनी दिली. राज्यात फक्त पश्चिम भागातच पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. हा पाऊस सोलापूर सांगोला आटपाडी माढा करमाळा कुर्डूवाडी, इंदापूर पाटस या भागात तसेच कोकणपट्टी पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले.
राज्यात परतीचा पाऊस सुरु होणार, शेतकऱ्यांना तारणार
राज्यात इतर भागात ढगळ वातावरण राहणार आहे. धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. बीड जिल्ह्यातही तुरळक पाऊस राहणार आहे. राज्यात परतीचा पाऊस येणार आहे. तो पाऊसच शेतकऱ्यांना तारणार असल्याचे डख म्हणाले, परतीचा पाऊसच शेतकऱ्यांना तारणार असल्याची माहिती पंजाबाराव डखांनी दिली आहे. सध्या मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीत पाऊस राहणार असल्याचे डख म्हणाले. राज्यात सर्वदूर काही पाऊस पडणार नसल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. दरम्यान, परतीचा पाऊस शेतकऱ्यांना तारणारा ठरणार आहे. खरीप हंगाम वाया गेलाआहे. मात्र रब्बीच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे डख म्हणाले.
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?