Shukra Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या चालीचं विशेष महत्त्व आहे. शुक्र ग्रहाला (Shukra Gochar) सुख, सौंदर्य आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानतात. ज्योतिष शास्त्रानुसार, 4 जुलै 2026 रोजी शुक्र देव आपल्या चालीत बदल करुन सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचं हे राशी परिवर्तन ग्रहांच्या तुलनेत फार महत्त्वाचं आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनाने कोणकोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
शुक्राच्या राशी परिवर्तनाने तूळ राशीला चांगलाच लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. अनेक नवीन गोष्टी तुम्ही या काळात शिकाल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
या राशीच्या कुंडलीतील धन भावात शुक्राचं आगमन होणार आहे. या कालावधीत शुक्र ग्रहाच्या प्रभावाने तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ परिणाम या राशीवर होणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
या राशीच्या प्रथम चरणात शुक्राचं संक्रमण होणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या पद-प्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली दिसेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
या राशीच्या भाग्याच्या स्थानी शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. या काळात तुमच्या नशिबाचे दरवाजे खुलतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच,धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. परदेशात प्रवासाला जाण्याचे योग लवकरच जुळून येणार आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
July Month Grah Gochar 2026 : जुलै महिन्यात लागोपाठ ग्रहांचं महासंक्रमण; 4, 16 आणि 24 तारखेला घडणार चमत्कार, वाचा ज्योतिषशास्त्र
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप