‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लहान मुलांची प्रतिक्रिया चर्चेत, काय म्हणाली? – Marathi News | Welcome to the jungle public review people after watching akshay kumar film


बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट पूर्णपणे मनोरंजन करणारा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असल्याचे सांगितले.

‘वेलकम टू द जंगल’ हा ॲक्शन, कॉमेडी, रोमान्स, ड्रामा आणि सस्पेन्स यांचा संगम असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात विनोदी प्रसंगांसोबतच थरारक घटनाही पाहायला मिळतात. मोठ्या स्टारकास्टमुळे चित्रपटाविषयी आधीपासूनच मोठी उत्सुकता होती आणि पहिल्या दिवसाच्या प्रतिसादावरून प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

कथानकात जंगलातील गोंधळ

चित्रपटात परेश रावल एका बनावट चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जंगलात सुरू होते. मात्र कथानकाला मोठे वळण तेव्हा मिळते, जेव्हा संपूर्ण टीम एका दुर्गम गावात पोहोचते. गावकऱ्यांना ही मंडळी भारतीय सैन्याचे जवान असल्याचा गैरसमज होतो आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांमधून विनोदी तसेच थरारक प्रसंग उलगडत जातात.

चित्रपटातील अनेक कलाकारांच्या वास्तविक आयुष्यातील काही प्रसिद्ध गोष्टी आणि संदर्भ विनोदी पद्धतीने कथेत गुंफण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रसंगांमध्ये प्रेक्षकांना हशा पिकताना दिसतो. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील गाणीही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.

प्रेक्षकांचे काय म्हणणे?

चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. ज्यामध्ये काही लोकांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये ‘चित्रपट खूपच भन्नाट आहे.’ ‘सुरुवातीपासून शेवटपर्यंत अजिबात कंटाळा येत नाही.”संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखा मनोरंजक चित्रपट.’ ‘सर्व कलाकारांनी उत्कृष्ट काम केले आहे.’ कॉमेडी सीन्स जबरदस्त आहेत.’ ‘हा चित्रपट सुपरहिट ठरणार.’ लहान मुलांनीही चित्रपटाला पसंती दर्शवत ‘खूप मजा आली’ अशी प्रतिक्रिया दिली. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अनेक लोकप्रिय कलाकार झळकले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *