नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत भाषण करण्यासाठी नव्हे तर युवा शक्तीला नमन करण्यासाठी आलो आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पाहतोय एक सरकार जे आपल्या भविष्यावर लाठीचार्ज करतंय. तुम्ही फक्त तरुण नाही तर या देशाचे भविष्य आहात. तुम्हाला पहिल्यांदा कॉकरोच म्हणणाऱ्या त्या महानुभावांचे आभार मानतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की स्वातंत्र्यलढ्यापर्वी तुमच्या वयाच्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं नसतं तर स्वातंत्र्य पाहायला मिळालं नसतं. काही लोक अशे होते ज्यांना इंग्रज होते त्यांना आतंकवादी मानायचे. मला असं वाटतं जे तुम्हाला आतंकवादी म्हणतात ते विदेशातून आलेत की काय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्हाला काल त्यांनी अमानुषपणे मारले. काही गुंड तुमच्यावर लाठी हल्ला करत होते. एका गुंडाचा फोटो वाँटेड म्हणून व्हायरल झाला आहे, तसाच व्हायरल करा असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आज जे सत्तेत बसलेत त्यांना माहिती नाही की पुढील काळात तुमच्यापैकी अनेक लोक त्या ठिकाणी बसणार आहेत. या लोकांना कदाचित माहिती नसेल की जे येणारं भविष्य आहे ते माझ्यासमोर उभं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पेपरफुटीमुळं विद्यार्थी आत्महत्या करत आहेत : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपकेचे खास आभार मानले.अभिजीत दिपके यानं एक ठिणगी पेटवली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावले त्यांचे फोटो इथं लावले आहेत. स्वतंत्र देशात विद्यार्थी पेपरफुटीमुळ आत्महत्या करत आहेत, आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं स्मरण ठेवावं लागेल. निवडणुकीला तीन वर्ष आहेत, खूप वेळ आहे, आता आपलं युद्ध सुरु झालं आहे. फक्त एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत सरकार बदलणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही बदल होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अभिजीत दिपके तुम्ही दिल्लीत आंदोलन करा, माझा प्रयत्न हे आंदोलन देशभरात कायम राहिलं पाहिजे. महाराष्ट्रात आम्ही सुरुवात केली आहे, महाराष्ट्र तुमच्यासोबत उभा आहे. महाराष्ट्राचा तरुण नेतृत्व करतोय, याचा अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मुंबईत सभा घेत पाठिंबा दिला होता. यानंतर आज उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले. ते उद्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडणार आहेत.
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं