Last Updated:
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजला 23 जुलैपासून सुरूवात होत आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण या सीरिजसाठी टीम इंडियाचा हेड कोच आहे.
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजला 23 जुलैपासून सुरूवात होत आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण या सीरिजसाठी टीम इंडियाचा हेड कोच आहे, तर श्रेयस अय्यर टीमचा कॅप्टन आहे. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही बीसीसीआय आणि निवड समितीने सूर्यकुमार यादवला हटवून श्रेयस अय्यरला टीमची कॅप्टन्सी दिली, पण श्रेयस कर्णधार झाल्यापासून टीम इंडियाला टी-20 मध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडमध्ये भारताला 2-0 तर इंग्लंडमध्ये 4-0 ने पराभव पत्करावा लागला.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातला पहिला टी-20 सामना गुरूवार 23 जुलैला हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. या सीरिजसाठी टीमच्या सीनियर खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ओपनर
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ओपनिंगला येतील. प्रभसिमरन सिंग हादेखील ओपनिंगला पर्याय आहे, पण पहिल्या सामन्यात त्याला बेंचवर बसावं लागू शकतं. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर इशान किशन, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि पाचव्या क्रमांकावर तिलक वर्मा खेळतील.
रिंकू सिंगही बेंचवर बसणार
या सीरिजसाठी रिंकू सिंगचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण आहे. सहाव्या क्रमांकावर शिवम दुबे तर सातव्या क्रमांकावर सुर्यांश शेडगे यांना संधी मिळू शकते, कारण दोघंही बॉलिंग करू शकतात. तर बॉलिंगमध्ये रवी बिष्णोई टीमचा प्रमुख स्पिनर असेल, याशिवाय आठव्या क्रमांकावर हर्ष दुबे खेळेल. फास्ट बॉलिंगमध्ये प्रिन्स यादव आणि मयंक यादव मैदानात उतरतील. मयंक यादव याचं दोन वर्षांनंतर टीम इंडियात कमबॅक होत आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, शिवम दुबे, सुर्यांश शेडगे, हर्ष दुबे, रवी बिष्णोई, प्रिन्स यादव, मयंक यादव
Mumbai,Maharashtra
Jul 21, 2026 11:43 PM IST
IND vs ZIM : 2 वर्षानंतर कमबॅक, आता थेट मैदानात उतरणार, पहिल्या T20 मध्ये अशी असणार भारताची प्लेइंग इलेव्हन!
