मुंबई कोकणासह मराठवाड्यातही पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, वातावरणात गारवा, कुठं-कुठं बरसला वरुणराजा?
मुंबई : जून महिना कोरडाच गेल्यानंतर आता महिनाअखेरीस मान्सूनच्या पावसाचं (Rain) दमदार आगमन झालं असून आज मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या धारा कोसळल्या. मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील (Marathwada) विविध जिल्ह्यातही मुसळधार पावसाने काही गावात पाणीच पाणी पाहायला मिळालं. तर, रायगडावरही पावसाच्या सरी कोसळल्याने निसर्गससौंदर्य खुलल्याचंही दिसून आलं. मुंबईत आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली,…