Last Updated:
MPSC ने 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेत मोठे बदल केले आहेत. वैकल्पिक विषय वगळले, मुलाखतीचे गुण 175, आणि एकूण गुण 1250 केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या पद्धतीत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 2027 पासून होणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयांचे दोन पेपर असतील. तसेच मुख्य परीक्षेचे गुणवाटपही बदलण्यात आले आहे. याबाबत आयोगाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी राज्य सेवा मुख्य परीक्षेत मराठी, इंग्रजी आणि एकच वैकल्पिक विषयाचा एक पेपर होता. राज्य सेवा मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयाचे दोन पेपर असतील. हे दोन्ही पेपर 250 गुणांचे असून ते केवळ अर्हताकारी (Qualifying) स्वरूपाचे असतील. त्यामुळे या पेपरांचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत ग्राह्य धरले जाणार नाहीत.
याशिवाय, वैकल्पिक विषयांचे हे दोन्ही पेपर फक्त पात्रताधारित असतील. म्हणजेच या पेपरांमध्ये मिळालेले गुण अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना मोजले जाणार नाहीत. मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर यांच्या गुणांच्या आधारे तयार केला जाईल. या पाच पेपरांचे एकूण 1250 गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षा पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयाचे दोन्ही पेपर वगळण्यात आले असून, मुलाखतीचे गुण १७५ निश्चित करण्यात आले आहेत. आयोगाच्या २५ जून २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२७ पासून भाषा विषयांचे दोन अर्हताकारी पेपर (मराठी व इंग्रजी), निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर असे एकूण सात अनिवार्य पेपर असतील. यापैकी मराठी व इंग्रजी हे दोन्ही भाषा विषयांचे पेपर २५ टक्के गुणांसह केवळ अर्हताकारी स्वरूपाचे असतील.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (#एमपीएससी) २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षा पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयाचे दोन्ही पेपर वगळण्यात आले असून, मुलाखतीचे गुण १७५ निश्चित करण्यात आले आहेत.
आयोगाच्या २५ जून २०२६ रोजीच्या… pic.twitter.com/JfNJ6Euc7G
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 22, 2026
आयोगाने स्पष्ट केले आहे की, राज्य सेवा मुख्य परीक्षा 2027 पासून वैकल्पिक विषय वाढवल्यामुळे मुख्य परीक्षेच्या गुणवाटपात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी मुख्य परीक्षेचे गुणवाटप 900 गुणांचे होते. आता ते वाढवून 1250 गुणांचे करण्यात आले आहे. आयोगाच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सेवा मुख्य परीक्षा अधिक संतुलित आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आयोगाने सांगितले की, 2027 पासून होणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षेला हा नवीन नियम लागू असेल. त्यामुळे MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवीन परीक्षा पद्धत आणि गुणवाटप लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. MPSC कडून लवकरच सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही आयोगाने नमूद केले आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 23, 2026 10:22 AM IST
