Satej Patil : MPSC च्या परीक्षा ऑफलाईन घ्या, ऑनलाईनमध्ये स्क्रीन शेअरिंग, क्लोनिंगसारखे धोके, 15 दिवस चार शिफ्टमध्ये परीक्षा चालतील, सतेज पाटील विधानपरिषदेत आक्रमक


मुंबई : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधानपरिषदेमध्ये 207 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जावी, अशी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी एमपीएससीची स्थापना परीक्षा घेण्यासाठी झालीय, आऊट सोर्सिंगसाठी नाही, असं म्हटलं. टीसीएस आणि आयबीपीएस कंपन्या चांगल्या असल्या तरी त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत अडचणी आहेत, असं सतेज पाटील म्हणाले. यासाठी पाटील यांनी तलाठी परीक्षेतील नॉर्मलायझेशनमुळं कसा घोळ होतो, ते सांगितलं यासाठी त्यांनी 200 मार्कांच्या परीक्षेत 214 गुण पडतात, असं उदाहरण देखील दिलं. 

Satej Patil : सतेज पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्रातल्या गावातल्या ग्रामीण भागातल्या सामान्य माणसांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारे एक केंद्र आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या आई-वडिलांची आशा असलेलं हे स्पर्धा परीक्षेचं केंद्र आहे. आज ज्यावेळी आमचं राज्य प्रगतशील म्हणून आम्ही त्याचा उल्लेख करतो, त्यामध्ये एमपीएससी मधून पास झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या राज्याच्या विकासामध्ये केलेले योगदान हे आपण कधीही विसरू शकत नाही, असं सतेज पाटील यांनी म्हटलं.   

सतेज पाटील पुढे म्हणाले की, आता एमपीएससी मार्फत घेतली जाणारी  गट ब आणि गट क इतर भरती परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा घाट घातला जातोय. ऑनलाईनमध्ये नॉर्मलायझेशन या पद्धतीचा प्रकार आलेला आहे. महाराष्ट्रात यापूर्वी महापोर्टल, टीईटी तलाठी भरतीत खासगी आयटी सेंटर आणि लॅबमध्ये घोटाळे झाले, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले होते. तलाठी भरतीमध्ये एका उमेदवाराला या नॉर्मलायझेशनमुळं  200 पैकी तब्बल 214 गुण मिळालेत. खाजगी सेंटरवर कॉम्प्युटर हॅक
करणे, रिमोट एक्सेस, स्क्रीन शेअरिंग आणि स्क्रीन क्लोनिंग करणं अत्यंत सोप आहे. या पद्धतीचा या ऑनलाइनचा परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो, अशा बाबी सतेज पाटील यांनी मांडल्या. 

ऑनलाईनसाठी 4000 प्रश्न तयार करावे लागतील 

एमपीएससीची ऑफलाइन परीक्षा होते त्यावेळी एकच पेपर या ठिकाणी निघतो. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकच पेपरची परीक्षा द्यावी लागते, असं सतेज पाटील यांनी म्हटलं.  आता ऑनलाईनमध्ये विविध शिफ्ट मध्ये परीक्षा घ्यावी लागेल.  एका दिवसात पेपरचे तीन-चार शिफ्ट कराव्या लागतील, 15 दिवस या ठिकाणी समजा ती परीक्षा चालली , चार ते पाच शिफ्ट मध्ये चालली तर एका परीक्षेसाठी किमान 4000 प्रश्न तयार करावे लागतील, असं सतेज पाटील यांनी म्हटलं.  पहिल्या शिफ्ट मधला प्रश्न दुसऱ्या शिफ्ट मध्ये असता कामा नये. दुसऱ्या मधला तिसऱ्यामध्ये असता कामा नाही आणि चौथ्यामध्ये असता कामा नाही. जर लाखो विद्यार्थी बसणार असतील तर 4000  प्रश्न या ठिकाणी हे करावे लागतील, असं सतेज पाटील यांनी म्हटलं.  

ऑफलाईन परीक्षा वादविरहित होत नाही

सतेज पाटील म्हणाले की ऑफलाईन परीक्षा घेत असताना सुद्धा 100 टक्के बिनचूक आणि वाद वादविरहित घेणं कठीण ठरतंय. अशावेळी या ऑनलाईन परीक्षा बिनचूक आणि वाद विरहित करणं शक्य होणार आहे का हा आमचा प्रश्न आहे. गट ब मध्ये मुख्य परीक्षेमध्ये सहा प्रश्न रद्द झालेले. तीन प्रश्नांची उत्तर बदलण्यात आली. एकूण 20 मार्कांचा फरक 2026 च्या परीक्षेमध्ये झाला. आयोगाच्या प्रत्येक परीक्षेमध्ये 10 ते 12 मार्काचे प्रश्न रद्द तर होतात किंवा बदलले जातात अशी अवस्था आहे. आत्ता सुद्धा अडचणी आहेत अडचणी नाहीत असं सतेज पाटील म्हणाले.  पुन्हा ऑनलाईन हे कशासाठी हा आमचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. गैर प्रकाराला आमंत्रण असणार आहे. कारण की परवा झालेल्या पोलीस भरतीच्या पुस्तक एक भरतीच्या पेपरमध्ये एकाच पुस्तकातून 90 टक्के प्रश्न आल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे, सतेज पाटील म्हणाले. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *