पहिल्या दोन पत्नींसोबत का झाला आमिर खानचा घटस्फोट? अनेक वर्षानंतर समोर आलं कारण – Marathi News | Aamir khan gauri spratt wedding when he talked about his 2 divorce and its reasons see details
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. आज ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच आता या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि त्याच्या दोन घटस्फोटांमागील कारणांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी एका मुलाखतीत आमिर खानने आपल्या दोन्ही विवाहांबाबत मनमोकळेपणाने भाष्य केले…