Nikhil Chavan on Tukaram Mundhe: फेमस ‘ऑल द बेस्ट’ नाटकातही तुकाराम मुंढेंचा प्रभाव; चायनीजची गाडी अन् नाव ऐकताच प्रेक्षकांचा जल्लोष


Nikhil Chavan’s Comic Scene on Tukaram Mundhe All the Best: ‘लागीर झालं जी’ फेम निखिल चव्हाण सध्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकामुळे चर्चेत आहे. या प्रसिद्ध कॉमेडी नाटकात तीन मित्रांची मैत्री आणि त्यांच्यावर आधारीत धम्माल कथा दाखवण्यात आली आहे.  या नाटकात निखिल चव्हाण व्यतिरिक्त मयुरेश पेम आणि मनमीत पेम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हे नाटक सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. दरम्यान, या नाटकातील एक संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या सीनमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा संदर्भ अगदी विनोदी शैलीत मांडण्यात आला आहे.  या सीनला प्रेक्षकांचीही विशेष दाद मिळत आहे. या सीनचा खास व्हिडीओ निखिल चव्हाणने सोशल मीडियात शेअर केला आहे.

 

फेमस ‘ऑल द बेस्ट’ नाटकातील ‘तो’ सीन सोशल मीडियात व्हायरल (Nikhil Chavan All the best Natak Tukaram Mundhe)

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केलीये. आतापर्यंत त्यांनी अनेक कंपन्यांवर कारवाई करत त्यांचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान, त्यांच्या या धडाकेबाज कारवाईची दखल ‘ऑल द बेस्ट’ या नाटकानेही घेतली आहे.  ‘ऑल द बेस्ट’ या नाटकातील सीन सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  प्रेक्षकांनीही या सीनला विशेष दाद दिली आहे.

या सीनमध्ये निखिल चव्हाण, मनमीत पेम आणि अभिनेत्रीसमोर अगदी विनोदी अंदाजात म्हणतो, ‘हा Chang याची चायनीज फूडची गाडी आहे. पण तू घाबरू नको… तुकाराम मुंढे साहेब इथे स्वतः याच्या गाडीवर येऊन खातात’, असं निखिल म्हणतो. या व्हायरल व्हिडीओवरही नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या सध्या सुरू असलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा संवाद प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेता निखिल चव्हाण याने हा सीन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.  त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम आयडीवर शेअर केला आहे.  नेटकऱ्यांनी निखिल चव्हाणच्या सीनचं विशेष कौतुक केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘छैया छैया’साठी मराठमोळ्या अभिनेत्रीची होती पहिली पसंती, पण वजन….; नेमका किस्सा काय? प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली…





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *