Meenakshi Seshadri: ती पुन्हा येतेय! ३० वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर मीनाक्षी शेषाद्री मायदेशी, सिनेइंडस्ट्रीतल्या कमबॅकबद्दलही केला खुलासा
मुंबई: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सुपरहिट करिअर सोडून परदेशात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. ८० आणि ९० च्या दशक गाजवलेल्या अनेक अभिनेत्री आता पुन्हा सिनेइंडस्ट्रीत सक्रिय होताना दिसतायत. आता परदेशात स्थायिक झालेल्या लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री तब्बल ३० वर्षांनंतर आपल्या मायभूमीत परतल्या आहेत. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा सक्रीय होण्यासाठी त्या सज्ज…